नानीबाई चिखली - कळसारोहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नानीबाई चिखली - कळसारोहन
नानीबाई चिखली - कळसारोहन

नानीबाई चिखली - कळसारोहन

sakal_logo
By

नानीबाई चिखलीत कळसारोहण सोहळा
नानीबाई चिखली, ता. १९ ः सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री महालक्ष्मी मंदिरात कळसारोहण तसेच कुंभमेळा झाला. लक्ष्मीच्या नावानं चांगभलं...च्या गजरात श्री दत्त देवस्थान संजीवनगिरी आडीचे परमाब्धिकार परमात्मराज महाराज यांच्या हस्ते सोहळा झाला.
प्रत्येकी तीन वर्षांनी होणारी श्री महालक्ष्मीची यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले होते. अल्पकाळातच हे काम पूर्ण झाले.
इरडे घालण्याच्या कार्यक्रमाने सोहळ्याची सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी होम हवन व धार्मिक विधी झाले, तर तिसऱ्या दिवशी माहेरवाशिनींच्या उपस्थितीत कुंभ मेळावा, कळस मिरवणूक काढली. तर दुपारी कळसारोहण समारंभ झाला. महिला व बालकल्याण सभापती शिवानी भोसले, बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह भोसले, परिवहन अधिकारी विजयसिंह भोसले, अरुण भोसले, सरपंच छाया चव्हाण, सर्व सदस्य उपस्थित होते. यानंतर महाप्रसाद झाला.
यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष शिरगुप्पे, उपाध्यक्ष सुरेश सवळेकरी, महादेव तुकान, रावसाहेब शिरगुप्पे, अनिल घाटगे, रघुनाथ गायकवाड, सचिन सूर्यवंशी, अजित शिंदे, रणजित बुरुड, सचिन जंगम, जनार्दन चिखलीकर, दादु कांबळे, सयाजी गळतगे, अमर कुंभार, गैबीसाब नदाफ, गजानन पोवार, सुदेश पाठणकर यांचे सहकार्य लाभले.
कळसारोहन सोहळ्यासाठी सुमारे एक हजार माहेरवाशिनी उपस्थित होत्या. त्यांना कमिटीतर्फे ताब्यांचा कलश व ओटी देण्यात आली. मिरवणुकीत त्यांचा सहभाग लक्षवेधी होता.