कागल ४ ॲंकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागल ४  ॲंकर
कागल ४ ॲंकर

कागल ४ ॲंकर

sakal_logo
By

01636
नानीबाई चिखली ः येथील वृक्षांच्या बुंध्याशी ग्रामस्थांनी केलेले उकिरडे व वाळलेले झाड.


उकिरड्यांमुळे गुदमरला वृक्षांचा श्वास
दुर्मिळ वृक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर; नानीबाई चिखलीतील निसर्गसंपदा वाचविण्याची गरज
रमजान कराडे ः सकाळ वृत्तसेवा
नानीबाई चिखली, ता. १ ः येथील रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची सुंदर कमान पहायला मिळते. वृक्षप्रेमींनी लावलेल्या, तसेच २५ ते ३० फूट वाढलेल्या वृक्षांत अनेक दुर्मिळ, औषधी वनस्पती आहेत; परंतु काही ग्रामस्थांनी वृक्षांच्या बुंध्याशी उकिरडे केल्याने यातील वृक्ष मृत झाले आहेत. उकिरडे हटविण्यासाठी ग्रामपंचायतीस वारंवार सूचना केल्या. मात्र, सूचनांकडे दुर्लक्ष केलेली ग्रामपंचायत आता तरी वृक्षांची ‘छाया’ जपण्यास प्राधान्य देणार की श्वास गुदमरून वृक्षांचा बळी जाण्यास हातभार लावणार, अशी विचारणा वृक्षप्रेमी करीत आहेत.

दहा वर्षांपूर्वी दिवंगत डॉ. खलील नाईक, संजय कुंभार, राजेंद्र चौगुले यांनी पर्यावरणप्रेमी ग्रुपची स्थापना केली होती. सुरुवातीला स्वतःसह त्यांनी देणगीदारांकडून सातशे रुपये प्रमाणे ३० हजार रुपये जमा करीत प्रवेशद्वारावर रस्त्याच्या दुतर्फा २५० वृक्षांचे रोपण केले. रोपे जगवण्यासाठी पहाटे चार वाजता उठत वारा, पाऊस, थंडी याची परवा न करता त्यांनी घागरीने सलग सहा वर्षे पाणी घालत ती जगवली देखील. प्रवेशद्वारावर सुंदर अशी कमान केली. कमानीवर सायंकाळी पाचनंतर पक्षांची शाळा भरलेली असते. असे असताना काही ग्रामस्थांनी रस्त्याच्या कडेला वृक्षांच्या बुंध्यातच शेण, राख, कचरा, मलमूत्र टाकत खतासाठी उकिरडे केले आहेत. उकिरड्यामध्ये उष्णता जास्त असल्याने याचा फटका वृक्षांना बसतो व काही दिवसांतच ते वाळतात. आतापर्यंत अशी आठ-दहा झाडे दगावली आहेत. तर आणखी झाडे दगावण्याची शक्यता आहे. याची कल्पना वृक्षप्रेमींनी ग्रामपंचायतीला व उकिरडे केलेल्या संबंधित ग्रामस्थांना दिली आहे. मात्र, ढीम्म प्रशासन, नेतेमंडळींचे दुर्लक्ष, नागरिकांनी विसरलेली कर्तव्ये यातून बळी जात आहे.

एक झाड जगविण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. २५० झाडे जगविली आहेत. यासाठी अनेक हालअपेष्टांचा सामना केलेला आहे. असे असताना पूर्ण वाढ झालेले वृक्ष उद्ध्वस्त होत असताना पाहणे क्लेशदायक ठरत आहे. किमान यापुढे तरी नागरिकांनी सहकार्य करावे.
- संजय कुंभार, राजेंद्र चौगुले, वृक्षप्रेमी.

Web Title: Todays Latest Marathi News Nnc22b01219 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..