नानीबाई चिखली - शिष्यवृत्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नानीबाई चिखली - शिष्यवृत्ती
नानीबाई चिखली - शिष्यवृत्ती

नानीबाई चिखली - शिष्यवृत्ती

sakal_logo
By

एनएमएमएस शिष्यवृत्ती
४८ ऐवजी ६० हजार

यंदापासून वाढ ; उत्पन्नाची मर्यादाही साडेतीन लाख


नानीबाई चिखली, ता. 14 ः आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या एनएमएमएस शिष्यवृत्तीच्या रकमेत यंदापासून वाढ केली आहे. उत्पन्नाची मर्यादाही वाढविली आहे. याबाबतचे अधिसूचना देणारे परिपत्रक शासनाने काढले आहे. यामुळे उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी होणार असून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळेल.
महाराष्ट्र राज्य परिषद, पुणे यांच्यामार्फत होणारी ही परीक्षा शासकीय, शासनमान्य अनुदानित तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देता येते. त्यासाठी पालकांचे उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असलेबाबतचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. आधी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना वर्षाला 6 हजार रुपये असे 4 वर्षांसाठी 24 हजार मिळायचे. 2016 - 17 पासून शिष्यवृत्ती रकमेत वाढ करून वर्षाला 12 हजार असे चार वर्षांसाठी 48 हजार रुपये मिळत असे.
यावर्षीपासून शिष्यवृत्तीची मुदत चारऐवजी पाच वर्षे केली असून यातून 60 हजार रु. मिळतील. उत्पन्नाची मर्यादाही दीड लाखांहून साडेतीन लाखांपर्यंत केली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उभारी मिळणार आहे.

कोट
एनएमएमएस परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढ होत आहे. उत्पन्नाची मर्यादा; शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ केल्याने गुणवान विद्यार्थ्यांना लाभ होईल. आता परीक्षा केंद्रेही वाढविण्याची गरज आहे.
- निसार मुल्ला, रानडे विद्यालय, सेनापती कापशी
कोट
शिष्यवृत्तीतून मिळणाऱ्या रकमेतून शिक्षणाचा खर्च भागतो. आमच्या शाळेत अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले. मलाही असे यश मिळवायचे आहे. शासनाचा निर्णय कौतुकास्पद असून त्याचे स्वागत करतो.
- प्रसाद डवरी, विद्यार्थी, चिखली इंग्लिश स्कूल चिखली