नानीबाई चिखली - दौड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नानीबाई चिखली - दौड
नानीबाई चिखली - दौड

नानीबाई चिखली - दौड

sakal_logo
By

01714
अर्जुननगर ः येथे एकता दौडमध्ये सहभागी छात्रसैनिक व मान्यवर.

‘देवचंद’तर्फे एकता दौड
नानीबाई चिखली ता. ३१ ः अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद कॉलेज व मोहनलाल दोशी विद्यालयातील छात्रसेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड व शपथग्रहण समारंभ झाला. यावेळी संभाजीनगरातून आयोजित केलेल्या एकता दौडमध्ये छात्रसैनिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. डी. पवार यांच्या हस्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर दौड सुरुवात करण्यात आली. छात्रसेना विभागप्रमुख मेजर डॉ. अशोक डोनर यांनी प्रास्ताविक केले. सागर मगदूम यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. प्रा. सुहास निव्हेकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची माहिती दिली. प्रा. बी. जी. पाटील, डॉ. जी. डी. इंगळे, प्रा. पी. बी. शिलेदार, सिद्धू बोरड, नितीन वराळे उपस्थित होते. विक्रम भोसले, तेजश्री पाटील, धीरज खोत यांनी परिश्रम घेतले. अध्यक्ष आशीष शाह, प्राचार्य डॉ. पी. पी. शहा यांचे मार्गदर्शन लाभले. शिवानंद चौगुले यांनी आभार मानले.