नानीबाई चिखली - सेवानिवृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नानीबाई चिखली - सेवानिवृत्त
नानीबाई चिखली - सेवानिवृत्त

नानीबाई चिखली - सेवानिवृत्त

sakal_logo
By

०१७३३
नानीबाई चिखली ः सामानगडकरी यांचा सत्कार करताना राजाक्का भोसले. यावेळी प्रमोदिनी भोसले.

विद्यार्थ्यांचे अश्रू हेच
सेवाकाळातील यश - देवर्षी


नानीबाई चिखली, ता. १७ ः विजयाताईंनी २७ वर्षांत चतुर्थश्रेणी कर्मचारी असूनही शाळेतील विद्यार्थ्यांची आई म्हणूनच सेवा बजावली. आज त्यांच्या निवृत्तिवेळी प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रू येत आहेत. हे अश्रूच त्यांच्या कामाची पोचपावती आहे, असे प्रतिपादन संस्थाध्यक्ष अरुण देवर्षी यांनी केले.
येथील विद्याप्रसारक मंडळ संचालित चिखली इंग्लिश स्कूल, चिखली शाळेतील विजया सामानगडकरी यांच्या निवृत्तीपर सत्कारावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. खडकेवाडा केंद्रप्रमुख एस. आर. देसाई, संचालक अरुण भोसले, यशवंत तुकान, धीरज मगदूम उपस्थित होते. सुरुवातीला राजाक्का भोसले यांच्याहस्ते, माजी सरपंच प्रमोदिनी भोसले यांच्या उपस्थितीत विजया सामानगडकरी यांचा सन्मानित केले. विजयाताई म्हणाल्या, ‘पतीनिधनानंतर २७ वर्षे सेवा केली.दोघांनी ५१ वर्षे सेवा केली. संस्थापक दिवंगत डी. एम. कुलकर्णी, मुख्याध्यापक, शिक्षकांच्या सहकार्यामुळेच यशस्वी झाले.’ मुख्याध्यापक सुरेश मगदूम यांनी प्रास्ताविक केले. तानिया किल्लेदार, ऋतुजा लोहार, एम. ए. कुलकर्णी, जी. आर. लोकरे, सुधाकर सोनारकर, व्ही. डी. पाटील, गिरीश गळतगे, अनंत घोटगावकर, संजीव सामानगडकरी, अवधूत सामानगडकरी, पांडुरंग भोई यांनी मनोगत व्यक्त केले. उत्तम कुंभार यांनी सूत्रसंचालन, पी. पी. पाटील यांनी आभार मानले.