नानीबाई चिखली - ग्रंथभेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नानीबाई चिखली - ग्रंथभेट
नानीबाई चिखली - ग्रंथभेट

नानीबाई चिखली - ग्रंथभेट

sakal_logo
By

1737
अर्जुनी : रमेश देसाई यांचेकडे ग्रंथ भेट देताना सिद्धी पाटील. यावेळी डॉ. विलास पाटील, अमर शेळके, तुकाराम देसाई व इतर.


यशासाठी ध्येयाशी
चिकटून राहा : डॉ. पाटील

अर्जुनीत ग्रंथभेट कार्यक्रम

नानीबाई चिखली ता. १९ : कष्ट हेच भांडवल मानले तर जगात अवघड काहीच नाही. प्रयत्न करा, चालायला शिका. यश हवे असल्यास ध्येयाशी चिकटून राहा,असे प्रतिपादन सारथी, पुणेचे वरिष्ठ प्रकल्प संचालक डॉ. विलास पाटील यांनी केले.
अर्जुनी (ता. कागल) येथे सुशीला मगदूम ग्रामवाचनालयातर्फे ग्रंथभेट कार्यक्रमात ते बोलत होते. उपसरपंच सुनील देसाई अध्यक्षस्थानी होते. यावेळी शिवाजी विद्यापीठामध्ये एमएसस्सी करणाऱ्या सिध्दी पाटील हिने शिष्यवृत्तीच्या रकमेतून दहा हजारांचे ग्रंथ वाचनालयास भेट दिले. वाचनालयाने दिव्या मिसाळ हिला सहा हजारांची स्पर्धा परीक्षेची पुस्तके दिली. सिध्दी पाटील म्हणाली, ‘वाचन आणि सातत्यपूर्ण अभ्यासामुळेच विद्यार्थीदशेत मोठी शिष्यवृत्ती मिळवू शकले. शिष्यवृत्तीतील काही भाग ग्रंथ रूपाने देणगी देऊन उत्तरदायित्व पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.’ वाचनालयाचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी प्रास्ताविक केले. अमर शेळके, तुकाराम देसाई, कृष्णात पेडणेकर, बाजीराव चौगुले, ग्रंथपाल जोतिराम मिसाळ, सुदाम देसाई, सज्जन कांबळे, जयसिंग कांबळे, उत्तम देसाई, राजाराम पेडणेकर, आनंदा उन्हाळे, बाबूराव मिसाळ, अशोक कडुकर उपस्थित होते. सचिव राहुल देसाई यांनी सूत्रसंचालन केले. के. एम. पेडणेकर यांनी आभार मानले.