नानीबाई चिखली - शिबीर सांगता समारोह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नानीबाई चिखली - शिबीर सांगता समारोह
नानीबाई चिखली - शिबीर सांगता समारोह

नानीबाई चिखली - शिबीर सांगता समारोह

sakal_logo
By

01765
अर्जुनी ः श्रमसंस्कार शिबिराच्या सांगतेप्रसंगी बोलताना सुनील देसाई. यावेळी सरपंच वर्षा सुतार, सुदाम देसाई.

राष्ट्रीय सेवा योजनेतून
विद्यार्थी घडतो ः देसाई

नानीबाई चिखली ता. १२ ः राष्ट्रीय सेवा योजना विभागातून कार्यक्षम विद्यार्थी घडतो. विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा विभाग म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेची ओळख असल्याचे मत उपसरपंच सुनील देसाई यांनी व्यक्त केले.
अर्जुनी (ता. कागल) येथे देवचंद महाविद्यालयाच्या (कनिष्ठ विभाग) श्रमसंस्कार शिबिर सांगताप्रसंगी ते बोलत होते. सरपंच वर्षा सुतार अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी सदस्य सुदाम देसाई, बाजीराव चौगुले उपस्थित होते. सात दिवसांच्या शिबिरात विद्यार्थ्यांनी ‘पाणी आडवा पाणी जिरवा’अंतर्गत जलबंधारा उभा केला. अरविंद पाटील यांनी ''दुग्धव्यवसाय झाला जीवनाचा आधार''वर, विलास देसाई यांनी ‘चुकून पडल्या गाठी...हसूच आले ओठी’, कांचन बिरनाळे यांनी ‘महिला व प्रसारमाध्यमे’वर तर सुभाष पाटील यांनी ‘बदलती कुटुंबव्यवस्था’वर मार्गदर्शन केले. प्रकल्प अधिकारी प्रा. डॉ. राहुल घटेकरी यांनी प्रास्ताविक केले. इंद्रजीत कापडे, सोनाली शेलार, समीक्षा परीट, दिव्या कांबळे तसेच सुदाम देसाई, बाजीराव चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. ए. ए. कुराडे, व्ही. पी. पाटील, टी. ए. पाटील, आर. एस. सोकासने, अर्चना पाटील, स्वयंसेवक उपस्थित होते. बी. एस. कुंभार यांनी आभार मानले.