नानीबाई चिखली - शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नानीबाई चिखली - शिबीर
नानीबाई चिखली - शिबीर

नानीबाई चिखली - शिबीर

sakal_logo
By

01783
देवचंद कॉलेज ः येथे मार्गदर्शन करताना तानाजी पाटील. यावेळी प्राचार्य डॉ. शाह, किरण चौगुले.

देवचंदमध्ये जातवैधता
प्रमाणपत्र शिबिर
नानीबाई चिखली, ता. 23 ः देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर (ता. कागल) येथे समान संधी केंद्रांतर्गत जातवैधता प्रमाणपत्र शिबिर झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून विधी अधिकारी जिल्हा जात पडताळणी समिती, कोल्हापूरचे तानाजी पाटील, समतादूत कागल सामाजिक न्याय विभागाचे किरण चौगुले हे होते. प्राचार्य डॉ. प्रशांत शाह अध्यक्षस्थानी होते.
यावेळी पाटील यांनी, जातवैधता करणे प्रक्रिया ऑनलाइन अर्ज करून करावयाची असल्याने ती सुलभ झाली आहे व कार्यालय कोल्हापूर येथे आहे. जात पडताळणीसाठी विद्यार्थ्यांनी योग्य पुरावे देऊन कागदपत्रे सादर केली तर जात पडताळणी 30 दिवसांत होत असल्याचे सांगितले. आरक्षणामुळे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय व क्रीडाक्षेत्रातील आरक्षणाचे फायदेही स्पष्ट केले.
यावेळी किरण चौगुले यांनी विद्यार्थ्यांसाठीच्या शासकीय योजना आणि समाजकल्याण विभागामार्फत मिळणाऱ्या सुविधा तसेच शासकीय वसतिगृहात मुलांसाठी असणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली. प्रा. नामदेव मधाळे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. प्रशांत शाह, उपप्राचार्य प्रा. अशोक पवार, पर्यवेक्षक प्रा. प्रभाकर जाधव, प्रा. नितीन कोले उपस्थित होते. प्रा. सदानंद झळके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सागर परीट यांनी आभार मानले.