
नानीबाई चिखली - जिम उद्घाटन
01789
कौलगे : येथे जिमच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच कांबळे, उपसरपंच पाटील व मान्यवर.
कौलगेत ओपन जिमचे उद्घाटन
नानीबाई चिखली, ता. २७ : चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. आरोग्याची गरज ओळखून येथे ओपन जीम सुरू केली. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कागल तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक नंदू पाटील यांनी केले.
कौलगे (ता. कागल) येथे आमदार हसन मुश्रीफ यांच्या विशेष फंडातून शिवराज विद्यालयाच्या पटांगणात ओपन जिम बसवली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सरपंच गजानन कांबळे अध्यक्षस्थानी होते. उपसरपंच अरूण पाटील, शिवराज विद्यालयाचे मुख्याध्यापक टी. जी. पाटील उपस्थित होते.
कौलगेमधील घरातील एकानेतरी सैन्यदलात योगदान दिले आहे. तरूणांनी जिमचा सैन्य भरतीवेळी चांगला फायदा करून घ्यावा, असे आवाहन करतानाच जिम सुरू केल्याबद्दल आमदार मुश्रीफ यांचे आभार उपसरपंच अरुण पाटील यांनी मानले. विजय पाटील यांनी प्रास्ताविक, मुख्याध्यापक टी. जी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रा.पं. सदस्य रमेश पाटील, गणपती गुरव, गजेंद्र सातपुते, दत्तात्रय पाटील, शिक्षक उपस्थित होते. प्रभाकर पाटील यांनी आभार मानले.