Sat, March 25, 2023

नानीबाई चिखली - चिंतन स्पर्धा
नानीबाई चिखली - चिंतन स्पर्धा
Published on : 31 January 2023, 12:33 pm
01851
चिंतन स्पर्धेत विवेक गवळी प्रथम
नानीबाई चिखली ः शिक्षकांचे वाचन व व्यक्तिमत्त्व विकासासाठी तसेच दैनंदिन अध्यापनामध्ये रंजकता येण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत कविता, वाचन, बोधकथा, चिंतन, व्यक्तिविशेष व माझा वेगळा उपक्रम विषयांतर्गत शिक्षकांसाठी स्पर्धांचे आयोजन केले होते. या ‘चिंतन’ स्पर्धेत विद्यामंदिर, करड्याळचे अध्यापक तसेच प्रसिद्ध सूत्रसंचालक विवेक कल्लाप्पा गवळी यांचा प्रथम क्रमांक आला. त्यांना गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर, विस्ताराधिकारी आर. एस. गावडे, सारिका कासोटे तसेच मुख्याध्यापिका छाया चौगुले यांचे प्रोत्साहन मिळाले.