नानीबाई चिखली - गावसभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नानीबाई चिखली - गावसभा
नानीबाई चिखली - गावसभा

नानीबाई चिखली - गावसभा

sakal_logo
By

नानीबाई चिखलीत गावसभा
नानीबाई चिखली ः ‘हर घर हर जल’ केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त योजनेंतर्गत येथील गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे. योजनेकरिता पाणी समिती नेमण्यासाठी ग्रामपंचायतीने गावसभा बोलावली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अल्लाबक्ष सय्यद होते. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली. सध्या गावाला असलेली पाणी योजना पन्नास वर्षांपूर्वीची आहे. वाढलेली लोकसंख्या, पाण्याच्या वापरामुळे नागरिकांना स्वच्छ, मुबलक पाणीपुरवठा होत नव्हता. नवीन पाणी योजनेची गरज होती. यातूनच केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त योजनेंतर्गत चार कोटी ९९ लाखांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. योजनेकरिता आवश्यक पाणी समिती नेमण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष गावसभा बोलवली होती. यावेळी ग्रामस्थांनी पाणी योजनेसंदर्भात प्रश्न सरपंच, सदस्यांना विचारण्यास सुरुवात केली. यामध्ये योजना फिल्टर हाऊससह होणार की नाही, पाण्याची टाकी कुठे उभारणार, सौर ऊर्जेचा वापर होणार काय, असे प्रश्न विचारले. यावेळी सरपंच अल्लाबक्ष सय्यद, ग्रामविकास अधिकारी जालिंदर बुवा यांनी उत्तरे दिली.