
नानीबाई चिखली - निवड
01875
प्रा. डॉ. चंद्रवदन नाईक यांची
अभ्यास मंडळ चेअरमनपदी निवड
नानीबाई चिखली ः देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर (ता. कागल) येथील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. चंद्रवदन नाईक यांची शिवाजी विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळाच्या चेअरमनपदी निवड झाली. ते पहिल्यांदाच सदस्य व चेअरमन म्हणून निवडून आले. पंधरा वर्षांहून अधिक काळ ते ‘देवचंद’मध्ये अध्यापन करतात. प्रा. डॉ. चंद्रवदन नाईक एमफिल, पीएचडीचे मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विद्यार्थी पीएचडी झाले असून एकाने एमफील पूर्ण केले आहे. तीन आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांत त्यांचा सहभाग होता. आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये २४ हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. २००७ ते २०१३ मध्ये ते राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी होते. निवडीसाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशीष शाह, उपाध्यक्ष डॉ. तृप्ती शाह, सुबोध शाह, प्रभारी प्राचार्य डॉ. प्रशांत शाह यांचे मार्गदर्शन लाभले.