नानीबाई चिखली - वाढदिवस

नानीबाई चिखली - वाढदिवस

01905
आशीष शाह यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव
नानीबाई चिखली, ता. १८ ः सीमाभागातील मुलांच्या शिक्षणासाठी दिवंगत पद्मभूषण देवचंद शाह यांनी जनता शिक्षण मंडळाची स्थापना केली. सहा दशकांचा विचार करता जनता शिक्षण मंडळ तसेच देवचंद कॉलेजने सीमाभागात शैक्षणिक क्रांती केली. त्यांचा समृद्ध शैक्षणिक वारसा योग्य चालविला जात असल्याचे समाधान आहे, असे जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशीष शाह यांनी सांगितले.
निपाणीत गांधी चौकातील ‘अनुदेव’ निवासस्थानी ४८ वा वाढदिनी ते बोलत होते. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी निपाणी, कोल्हापुरातून अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष तसेच फोनद्वारे शुभेच्छा दिल्या.
यामध्ये निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील, उत्तम पाटील, लक्ष्मण चिंगळे, राजू गुंदेशा, बसवराज जोल्ले, राजू पोवार, डॉ. राजेश बनवण्णा, ‘देवचंद’चे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रशांत शाह, उपप्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे, ‘कनिष्ठ’चे उपप्राचार्य अशोक पवार, पर्यवेक्षक प्रभाकर जाधव, कार्यालयीन प्रमुख डी. बी. पाटील तसेच प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, मोहनलाल दोशी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. एस. जाधव, त्यांचा शिक्षकवर्गासह शहा उद्योग भवनमधील स्टाफ, विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून शुभेच्छा दिल्या.
आमदार सतेज पाटील, मोहनलाल हरगोविंददास फर्मचे सिद्धार्थ पटेल, उद्योजक संजय घोडावत, मौनी विद्यापीठ गारगोटीचे चेअरमन आशीष कोरगावकर, नाशिकचे देवीदास सारडा, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, मंडलिक कारखान्याचे संचालक शहाजी यादव, लुईस शहा, जयेश ओसवाल, शिवाजी मोहिते, राजू पारीख, सुजितसिंग मोहिते, जयवंत भाटले, उद्योजक सुरेश शेट्टी आदींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. दयानंद अनुसे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com