नानीबाई चिखली - होम मिनिस्टर

नानीबाई चिखली - होम मिनिस्टर

01910
होम मिनिस्टर स्पर्धेत गौरी कांबळे प्रथम
नानीबाई चिखली ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त येथील पंचशील तरुण मंडळाच्या वतीने होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये गौरी राकेश कांबळे यांनी प्रथम क्रमांक मिळवित मानाची पैठणी पटकावली. द्वितीय अश्विनी पोपट कांबळे, तृतीय सुषमा किरण कांबळे यांनी पटकावला. बक्षीस वितरण माजी सरपंच शोभा कांबळे, पोलिसपाटील अमृता कांबळे, ग्रामपंचायत सदस्या सरस्वती चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे निवेदन सागर कोळी यांनी केले. यावेळी उपसरपंच विजय घस्ती, माजी सैनिक महादेव कांबळे तसेच पंचशीलनगर, अण्णाभाऊ साठे तसेच बौद्धनगरमधील ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com