नृसिंहवाडी लग्नसराई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नृसिंहवाडी लग्नसराई
नृसिंहवाडी लग्नसराई

नृसिंहवाडी लग्नसराई

sakal_logo
By

यात्री निवासामधून
सनई-चौघड्याचे सूर
नृसिंहवाडीत गजबज; मुंज, लग्नाची धामधूम
जितेंद्र आणुजे ः सकाळ वृत्तसेवा
नृसिंहवाडी, ता. ३ ः येथील यात्री निवासस्थानांत सध्या लग्नसराई, मुंज यांची धामधूम सुरू असून दोन वर्षांत बंद असलेले सनई-चौघड्यांचे सूर पुन्हा परिसरात निनादत आहेत.
लॉकडाऊन व महापूर अशा दुष्ट चक्रामुळे येथील अर्थकारण ठप्प होते. नृसिंहवाडी हे धार्मिक क्षेत्र असल्यामुळे राज्यभरातून अनेक भाविक शुभकार्यांसाठी एप्रिल, मेमध्ये येत असतात. लग्न, मुंज, अभिषेक, शांती यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होते. मंडप व्यवस्था, मंगल कार्यालयापासून ते डेकोरेटर्स, बॅण्ड पथके व भोजन व्यवस्था करणाऱ्यांपर्यंत सर्वच स्तरावर आर्थिक उलाढाल होते.
सध्या उन्हाळी सुट्टी व शुभ कार्यांचे मुहूर्त असल्याने येथील दत्त मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होताना दिसत आहे. गेल्या दोन वर्षांत बंद असलेले व्यवसाय पुन्हा उभारी घेत आहेत. हाताला काम व श्रमाला दाम मिळत असल्याने येथील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. लग्नसराई व मौजीबंधन यामुळे यात्रीनिवास येथे गजबज जाणवते.

कोट
गेले दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगल कार्यालये पूर्णपणे बंद होती. यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. सध्या लग्नसराईची धामधूम सुरू असल्यामुळे उद्योजकांना चार सुखाचे दिवस आले आहेत.
- विशाल सोमण, सोमण यात्रीनिवास

Web Title: Todays Latest Marathi News Nrh22b00446 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top