नृसिंहवाडीत उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नृसिंहवाडीत उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार येणार
नृसिंहवाडीत उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार येणार

नृसिंहवाडीत उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार येणार

sakal_logo
By

नृसिंहवाडीत आज
बहुमजली पार्किंगचे लोकार्पण
------------
उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह अन्य मंत्र्यांची उपस्थिती

नृसिंहवाडी, ता. १४ ः येथील ग्रामपंचायतीतर्फे कन्यागत महापर्वकाळ अंतर्गत विकास निधीतील पावणेसात कोटी रुपये खर्चून बांधलेल्या चारचाकी बहुमजली वाहन पार्किंगचा लोकार्पण सोहळा रविवार (ता. १५) सकाळी ९ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत आहे.
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, माजी आमदार उल्हास पाटील, प्रातांधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके यांची उपस्थिती आहे, अशी माहिती उपसरपंच रमेश मोरे यांनी दिली.
ते म्हणाले, ‘जी-प्लस टू अशा स्वरूपात बहुमजली पार्किंगचे नियोजन आहे. यामुळे प्रत्येक मजल्यावर शंभर याप्रमाणे एकूण तीनशे चार चाकी वाहनांची पार्किंगची सुविधा होणार आहे. या पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.’

पूरग्रस्त मदतीपासून वंचितच
गेल्या वर्षी जुलैला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरोळ येथे पूरग्रस्तांना भरीव मदतीचे आश्वासन दिले होते, मात्र वर्ष झाले तरी अनेक दुकानदारांना अद्याप मदत मिळाली नाही, तर सुमारे दहा हजार कुटुंबातील १० हजार कोटी रुपये पूरग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे श्री. पवार यांनी लक्ष घालून पूरग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी माजी उपसरपंच अभिजित जगदाळे यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Nrh22b00452 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top