नृसिंहवाडी- खिद्रापूर पर्यटन बस सेवेस निधीअभावी ब्रेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नृसिंहवाडी- खिद्रापूर पर्यटन बस सेवेस निधीअभावी ब्रेक
नृसिंहवाडी- खिद्रापूर पर्यटन बस सेवेस निधीअभावी ब्रेक

नृसिंहवाडी- खिद्रापूर पर्यटन बस सेवेस निधीअभावी ब्रेक

sakal_logo
By

नृसिंहवाडी- खिद्रापूर पर्यटन
बस सेवेस निधीअभावी ब्रेक
=========
नृसिंहवाडी, ता. २३ ः नृसिंहवाडी ते खिद्रापूर या मार्गावरील ऐतिहासिक वास्तू व मंदिराचे भाविकांना मोफत दर्शन व्हावे, प्राचीन सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा यांचे जतन व्हावे या हेतूने सुरू केलेली मोफत दर्शन बससेवेला शासकीय निधीअभावी ब्रेक लागला आहे.
औरवाड येथील पंचगंगा फाउंडेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद दुग्गे यांच्या पुढाकाराने या बससेवेचा प्रारंभ केला. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते व आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत याचा फेब्रुवारीमध्ये प्रारंभ केला होता. येथील दत मंदिरापासून प्रारंभ होऊन औरवाड अमरेश्वर मंदिर (घेवड्याचे वेल), कुरुंदवाड सरसेनापती संताजी घोरपडे स्मारक व ऐतिहासिक घाट, कुरुंदवाड गावातील पुरातन विष्णू मंदिर, अकिवाट विद्यासागर मंदिर व खिद्रापूर येथील ऐतिहासिक कलात्मकतेची सुंदर आविष्कार असणारे कोपेश्वर मंदिर येथून परत नृसिंहवाडी येथे येत होती. त्याला भाविकांचाही प्रतिसाद मिळाला. सुमारे दोन महिने या बसने भाविकांना प्रत्येक रविवारी पर्यटनाचा आनंद दिला. सध्या निधीअभावी ही बससेवा बंद आहे. याबाबत भाविकांमधून विचारणा होत आहे. दोन महिने पदरमोड करून प्रसाद दुग्‍गे यांनी भाविकांना पर्यटनाचा आनंद मिळवून दिला. परंतु सध्या ती बंद आहे. बसची चाके पुन्हा गतिमान करण्यासाठी शासनाने इंधन खर्च व बसभाडे खर्च दिल्यास ती बस पुन्हा भाविकांना घेऊन पर्यटनाचा आनंद मिळवून देऊ शकणार आहे.
------------
एक महिन्यापासून निधीअभावी भाविकांना घेऊन जाणारी नृसिंहवाडी ते खिद्रापूर मोफत दर्शन बससेवा बंद आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार-आमदार यांच्याकडे निधी मिळावा याची रीतसर मागणी केली आहे. प्राप्त होताच दर्शन बस सेवा सुरळीत होऊ शकेल.
-प्रसाद दुग्गे, संयोजक

Web Title: Todays Latest Marathi News Nrh22b00461 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..