अवैध धंदे फोफावल्यामुळे पावित्र्य धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध धंदे फोफावल्यामुळे पावित्र्य धोक्यात
अवैध धंदे फोफावल्यामुळे पावित्र्य धोक्यात

अवैध धंदे फोफावल्यामुळे पावित्र्य धोक्यात

sakal_logo
By

लोगो ः फोकस पर्यटनाचा विकास तीर्थक्षेत्राचा ः ५

अवैध धंदे फोफावल्यामुळे पावित्र्य धोक्यात

जितेंद्र आणुजे ः सकाळ वृत्तसेवा
नृसिंहवाडी, ता. ३ ः दत्त महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या धार्मिक, ऐतिहासिक भूमीमध्ये दत्तगुरूंच्या अवतारापैकी एक श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी येथे सुमारे बारा वर्षे तपश्चर्या केली. त्यामुळे त्यांच्या नावावरूनच या तीर्थक्षेत्राला नृसिंहवाडी असे नामकरण प्राप्त झाले आहे. तपोभूमीचे धार्मिक महत्त्व मोठ्या प्रमाणात असून, त्याचे पावित्र्य रखणे ही सर्वांची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे, मात्र काही मूठभर अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडून पावित्र्य धोक्यात येत आहे. काही ठिकाणी विनापरवाना गावठी दारू घरांमधून विकली जात आहे. यामध्ये विशेष करून युवकांचा पुढाकार असून, त्यांनी प्लास्टिक पाऊचमधून गावठी दारू विकण्याची शक्कल लढवली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी प्लास्टिक कचरा वाढून अस्वच्छतेत वाढ होत आहे. मरगाई चौक व स्मशानभूमीमध्ये मटका व्यावसायिकांकडून ऑनलाईन मटका घेतला जात आहे. पोलिसांनी वेळीच त्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक आहे.
---------------------------
नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची ही तपोभूमी आहे. अवैध व्यवसायामुळे तीर्थक्षेत्राची सांस्कृतिक हानी होऊन पावित्र्यास बाधा येऊ नये. यासाठी संबंधित अवैध व्यावसायिकांनी विनापरवाना व्यवसाय बंद करावेत. अन्यथा राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळामार्फत निवेदन देऊन विशेष बाब म्हणून तीर्थक्षेत्रावरील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रयत्नशील राहू.
- संजय शिरटीकर, भाजप नेते
===============
नृसिंहवाडी तीर्थक्षेत्रावर गावठी दारू विक्री किंवा अवैध धंदे सुरू असतील तर ते तातडीने कारवाई करून बंद केले जातील.
-दत्तात्रय बोरीगिड्डे, पोलिस निरीक्षक, शिरोळ