नृसिंहवाडी हाऊसफुल्ल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नृसिंहवाडी हाऊसफुल्ल
नृसिंहवाडी हाऊसफुल्ल

नृसिंहवाडी हाऊसफुल्ल

sakal_logo
By

00489

नृसिंहवाडी भाविकांनी ‘हाऊसफुल्ल’

कोजागरी पौर्णिमा, रविवारमुळे दर्शनासाठी दत्त मंदिरात गर्दी

नृसिंहवाडी, ता. ९ ः येथे आज कोजागरी पौर्णिमेनिमित्त व रविवारच्या साप्ताहिक सुटीमुळे दत्त दर्शनाच्या निमित्ताने दत्त मंदिर भाविकांनी ‘हाऊसफुल्ल’ होते. मंदिरात ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पहाटे काकड आरती झाली. सकाळी आठ ते बारा यावेळेत पंचामृत अभिषेक झाला. साडेबाराला महापूजेवेळी भाविकांची मंदिरासमोर अभिषेक पाहण्यासाठी गर्दी होती.
दुपारी तीनला पवमान पंचसूक्त पठण झाले. रात्री आठ ते साडेनऊ या वेळेत धूप, आरती, पालखी सोहळा समाप्तीनंतर कोजागरीनिमित्त दत्तभक्तांना मसाले दूध वाटप करण्यात आले.
कोजागरी पौर्णिमा व रविवारची सुटी एकत्र आल्यामुळे मिठाई व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात लगबग जाणवली. तीनमजली पार्किंग ‘हाऊसफुल्ल’ होऊन रस्त्याच्या अनेक ठिकाणी चारचाकी वाहने पार्किंग करण्यात आली होती. येथील काही भागामध्ये दुचाकी, तीनचाकी रिक्षा व चारचाकी वाहन अशा एकत्र पार्किंगमुळे भाविकांना दत्त मंदिराकडे जाताना अडचणी आल्या.
.......

ग्रामपंचायत कर्मचारी
संख्या वाढवणे गरजेचे

अपुऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक पार्किंग व्यवस्था करताना त्यांची त्रेधातिरपीट उडते. दुचाकी पार्किंगबाबत अद्याप ग्रामपंचायतीच्या वतीने कोणतेच पद्धतीने नियोजन झालेले नाही. ही वाहने रस्त्यावर कशीही लावण्यात आल्याने कोणतेही नियंत्रण वा शिस्त नव्हती.
............
फोटो ओळ...
नृसिंहवाडी
येथे आज रविवार व कोजागरी पौर्णिमेनिमित्त दत्त मंदिर भाविकांनी ‘हाऊसफुल्ल’ झाले. नेहमीच्या गर्दीना उच्चांक मोडला होता.
छाया : जितेंद्र आणुजे, नृसिंहवाडी