नृसिंहवाडी गुरुद्वादशी उत्सव उत्साहात संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नृसिंहवाडी गुरुद्वादशी उत्सव उत्साहात संपन्न
नृसिंहवाडी गुरुद्वादशी उत्सव उत्साहात संपन्न

नृसिंहवाडी गुरुद्वादशी उत्सव उत्साहात संपन्न

sakal_logo
By

फोटोओळ
नृसिंहवाडी ः येथे गुरुद्वादशी उत्सवानिमित्त दत्त मंदिरात बांधण्यात आलेली श्रींची गंधपूजा व पानपूजा.
...............


नृसिंहवाडी दत्त मंदिरात
गुरुद्वादशी उत्सव उत्साहात
नृसिंहवाडी, ता. २२ ः गुरुद्वादशी उत्सवानिमित्त आज श्री दत्त मंदिरात पहाटे चारला काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत पंचामृत अभिषेक, नंतर श्रींच्या चरणकमलावर महापूजा, धूप, दीप, आरती, इंदुकोटी, नैवेद्य व महाप्रसाद होऊन सायंकाळी सातला पवमान पंचसूक्त पठण झाले. रात्री दहाला कीर्तन व रात्री दीडनंतर धूप, दीप, आरती व पालखी सोहळा झाला. दिवसरात्र मंदिर दत्त दर्शनासाठी खुले होते.
दरम्यान, दत्त देव संस्थांनमार्फत गर्दीचे नियोजन करण्यासाठी दर्शन रांग नियोजन, मुखदर्शन, मंदिराला आकर्षक रोषणाई, ध्वनिक्षेपक यंत्रणा, सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक आदी व्यवस्था करण्यात आली होती. देवस्थानच्या सहकार्याने पारंपरिक मानकरी मोकाशी, रामचंद्र पुजारी, श्रीपाद पुजारी, गणेश पुजारी, रामचंद्र बड्ड पुजारी, राहुल जेरेपुजारी, जयंत पुजारी, सीताराम पुजारी, अरविंद पुजारी, गजानन पुजारी, अवधूत बोरगावकर आदींनी या उत्सवाचे नियोजन केले. रामचंद्र पुजारी आणि परिवार यांनी महाप्रसादाचे नेटके नियोजन केले होते. उद्या (ता. २३) सकाळी सहानंतर श्रींच्या उत्सवमूर्तीची महापूजा झाल्यावर लळिताच्या कीर्तनाने गुरुद्वादशी उत्सवाची सांगता होणार आहे.
................