सूर्यग्रहणानिमित्त नृसिंहवाडीत भाविकांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सूर्यग्रहणानिमित्त नृसिंहवाडीत भाविकांची गर्दी
सूर्यग्रहणानिमित्त नृसिंहवाडीत भाविकांची गर्दी

सूर्यग्रहणानिमित्त नृसिंहवाडीत भाविकांची गर्दी

sakal_logo
By

00505

---------
सूर्यग्रहणानिमित्त नृसिंहवाडीत भाविकांची गर्दी
नृसिंहवाडी, ता. २५ ः येथील श्री दत्त मंदिर परिसरात कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर खंडग्रास सूर्यग्रहणानिमित्त अनेक भाविक व यात्रेकरूंची स्नान व दर्शनासाठी गर्दी होती. ग्रहण काळात पुरुष व महिलांनी नदीच्या पाण्यात राहून जप जाप्य केले. हवामना स्वच्छ असल्याने शाळेतील मुले व तरुणांनी गॉगल व एक्सरे फिल्मच्या सहायाने सूर्यग्रहण पाहिले.
सूर्यग्रहणानिमित्त आज सकाळी साडेचार वाजता येथील दत्त मंदिरात काकड आरती व षोडशोपचार पूजा झाली. चार वाजून ५७ मिनिटांनी ग्रहण स्पर्श व सायंकाळी साडेसहा वाजता ग्रहण मोक्षचे श्रींना स्नान घातले. त्यानंतर श्रीचे चरणकमलावर महापूजा केली. महापूजेनंतर धूप, दीप, आरती होऊन पालखी सोहळा झाला व रात्री साडेनऊनंतर शेजारती केली.
दरम्यान ग्रहण पर्वकाल स्नान करण्यासाठी परिसर तसेच सांगली, कोल्हापूर, सातारा, बेळगाव जिल्ह्यातून तसेच कर्नाटक व गोवा राज्यातूनही अनेक भाविक दाखल झाले होते. ग्रहण संपल्यानंतर असंख्य भाविकांनी ‘श्री गुरुदेव दत्त’ च्या गजरात नदीत स्नान करून श्री चरणाचे दर्शन घेतले. येथील दत्त देव संस्थान मार्फत दर्शनरांग, मुखदर्शन, तसेच नदी किनारी सुरक्षा रक्षक, कापडी मंडप, सी सी टीव्ही कॅमेरा आदी व्यवस्था केली होती, असे अध्यक्ष सदाशिव जेरे पुजारी व सचिव संजय नारायण पुजारी यांनी सांगितले. येथील नावाडी संजय गावडे व अरुण गावडे यांनी नदीकाठी सुरक्षितेसाठी नाव तैनात ठेवली होती.