नृसिंहवाडी त साहित्य महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नृसिंहवाडी त साहित्य महोत्सव
नृसिंहवाडी त साहित्य महोत्सव

नृसिंहवाडी त साहित्य महोत्सव

sakal_logo
By

00509
महोत्सवासाठी दर्शन वडेर यांनी तयार केलेले बोधचिन्ह.
................
कलागंधर्व साहित्य महोत्सवाचे
नृसिंहवाडीत २० ला आयोजन

नृसिंहवाडी ता. २ : साहित्य, संगीत, कलाप्रेमी मंडळामार्फत कलागंधर्व साहित्य महोत्सव रविवारी (ता. २० नोव्हेंबर) होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत मंडळाच्या सदस्यांनी दिली.
साहित्य, संगीत, काव्य व नाट्य अशा विविध कलाप्रकारांचा समावेश असणाऱ्या महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. यंदा शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष व संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे प्रमुख पाहुणे असतील. ग्रंथदिंडीनंतर होणाऱ्या उद्घाटन सत्रात प्रा. मुकुंद पुजारी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पाककलाकारांना अन्नपूर्णा गौरव सन्मान देण्यात येणार असून इयत्ता दहावीतील गुणवंतांचा सत्कार होईल. कवी प्रशांत आडे व गुरुप्रसाद रिसबूड यांच्या कवितासंग्रहांचे प्रकाशन होईल. महोत्सव दिवसभर असून कथाकथन व कविता वाचनानंतर लता मंगेशकर यांना श्रद्धांजलीपर गीतांचा कार्यक्रम आहे. ‘बाबा लगीन’ विनोदी नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होईल. माहेश्वरी मंगल कार्यालयात होणाऱ्या महोत्सवाच्या ठिकाणी कलाप्रदर्शन भरेल. सचिव मुकुंद जोशी म्हणाले, ‘हा महोत्सव नृसिंहवाडीचा सांस्कृतिक प्रवाह सुरू ठेवण्याचा प्रयत्न असून तरुण कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे ठरवले आहे." दानशूरांनी आर्थिक सहभाग नोंदवून कार्याला हातभार लावण्याचे आवाहन अध्यक्ष बाळासाहेब आलासकर यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष डॉ. दिनेश फडणीस, कार्याध्यक्ष दत्तात्रय पुजारी, सहसचिव विलास जोशी, गुरुप्रसाद रिसबूड, दत्तात्रय कुलकर्णी, प्रशांत आडे, दर्शन वडेर, अमोल विभूते उपस्थित होते.