नृसिंहवाडी पारायण सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नृसिंहवाडी पारायण सोहळा
नृसिंहवाडी पारायण सोहळा

नृसिंहवाडी पारायण सोहळा

sakal_logo
By

नृसिंहवाडीत दत्तधाममध्ये
श्री गुरुचरित्र पारायण सोहळा

नृसिंहवाडी ता. २८ : येथील आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ( दत्तधाम) येथे श्री दत्तजयंतीनिमित्त एक डिसेंबर ते आठ डिसेंबर अखेर सामूहिक श्री गुरुचरित्रवाचन पारायण सप्ताह, अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताह, महाप्रसाद तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यानिमित्त शुक्रवारी (ता. २) नित्य स्वाहाकार, श्री गणेश याग, मनोबोध याग. शनिवार (ता. ३ ) नित्य स्वाहाकार, श्री गीताई याग. रविवार (ता. ४) नित्य स्वाहाकार, चंडीयाग. सोमवार (ता. ५) नित्य स्वाहाकार, श्री स्वामी याग, मंगळवार (ता. ६) नित्य स्वाहाकार, श्री रुद्रयाग, श्री मल्हारी याग. बुधवारी (ता. ७) नित्य स्वाहाकार, बली पुर्णाहुती, दुपारी १२:३९ वा. श्री दत्त जन्मोत्सव सोहळा होईल. शुक्रवारी (ता. ८) श्री सत्यदत्त पूजन, देवता विसर्जन, अखंड नाम,जप, यज्ञ सप्ताह सांगता व १०:३० वा.महाआरती होवुन महाप्रसाद होईल.
दैनंदिन कार्यक्रमामध्ये सकाळी ८ वा.भूपाळी, सव्वाआठ वाजता नित्यस्वाहाकार, साडेआठ ते दहा वा.सामूहिक श्री गुरुचरित्रवाचन, साडेदहा वा.नैवेद्य आरती, १०:४५ वा.विशेष याग, दुपारी २ ते ५:३० वा.श्री दुर्गा सप्तशती व श्री स्वामीचरित्र पाठ वाचन, सायंकाळी सहा वा.औदुंबर प्रदक्षिणा, साडेसहा वा.नैवेद्य आरती, सात वा. विविध विषयावर मार्गदर्शन, साडेसात वा.नित्यसेवा व नित्यध्यान असे कार्यक्रम होतील. सप्ताहकाळातील सर्व धार्मिक कार्यक्रमाचा सर्व भाविक,श्री स्वामी सेवेकरी ,भक्तानी लाभ घ्यावा तसेच ज्या भाविकांना सप्ताहकाळात अन्नदान करण्यासाठी धान्य, वस्तू, देणगी, द्यावयाचे असेल त्यानी श्री स्वामी समर्थ गुरुपीठ,(दत्तधाम)येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.