
नृसिंहवाडीत १२ टन कचरा गोळा
00568
नृसिंहवाडी ः येथे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दत्त जयंती निमित्त बारा टन कचरा गोळा केला.
----------
नृसिंहवाडीत १२ टन कचरा गोळा
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे संकलन
नृसिंहवाडी, ता. ९ ः येथे दत्त जयंतीनिमित्त येणाऱ्या हजारो भाविकांमुळे स्वच्छतेचा प्रश्न नेहमी ऐरणीवर येतो. यासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दत्त जयंतीपूर्वी आणि नंतर दोन दिवस स्वच्छता अभियान घेवून १२ टन कचरा गोळा केला. प्रतिष्ठानच्या या सामाजिक कार्याचे ग्रामपंचायतीने कौतुक केले.
दत्त जयंती उत्साहात झाली. दत्त दर्शनासाठी अडीच लाखाहून अधिक भविकांनी गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा) यांच्यावतीने दोन दिवस स्वच्छता अभियान घेतले. सुमारे ११०० श्री सदस्यांनी या अभियानात भाग घेतला. दत्त मंदिर परिसरातील उत्तर, दक्षिण घाट, मिठाई पेठ, गावभाग, ओतवाडी, स्वामी समर्थ मंदिर परिसर आदी भागात स्वच्छता केली. यात ओला कचरा आणि सुका कचरा असा १२ टन कचरा गोळा केल्याचे सदस्य अभिजीत लिंगनूरकर यांनी सांगितले. स्वच्छता अभियानाबद्दल उपसरपंच पूनम जाधव, ग्रामसेवक बी. एन. टोणे यांनी आभार मानले.