नृसिंहवाडी येथे भागवत महापुराण सप्ताहाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नृसिंहवाडी येथे भागवत महापुराण सप्ताहाचे आयोजन
नृसिंहवाडी येथे भागवत महापुराण सप्ताहाचे आयोजन

नृसिंहवाडी येथे भागवत महापुराण सप्ताहाचे आयोजन

sakal_logo
By

नृसिंहवाडीत उद्यापासून भागवत महापुराण सप्ताह
नृसिंहवाडी ः येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानमार्फत मंदिरातील वेदमूर्ती भैरंभट जेरेपुजारी प्रसादालयाच्या प्रांगणात १२ ते १९ जानेवारीअखेर भागवत महापुराण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती दत्त देव संस्थानचे अध्यक्ष सदाशिव जेरेपुजारी व सचिव संजय पुजारी यांनी दिली. सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत भागवत संहिता पारायण व दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत भागवत कथा व आरती होणार आहे. गुरुवारी (ता. १२) पुण्याहवाचन, मधुपर्क व ग्रंथपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, गुरुवारी (ता. १९) गीता विष्णुसहस्रनाम पठण, व्यासपूजन, ग्रंथ मिरवणूक व अवभृत स्नानाने सांगता होणार आहे. कथा निरूपण सातारा येथील अहिताग्नि गोविंदशास्त्री जोशी करणार आहेत. ता. १२ ला वराह अवतार कथा, गोकर्ण माहात्म्य, शुक्रवारी (ता. १३) भरत व कपिलाख्यान, शनिवारी (ता. १४) नृसिंहाख्यान, रविवारी (ता. १५) कृष्णजन्म व पाळणा, सोमवारी (ता. १६) गोपाळकाला व रुक्मिणी विवाह, मंगळवारी (ता. १७) श्रीकृष्ण चरित्र व सुदमाख्यान, बुधवारी (ता. १८) श्रीकृष्ण निजधामगमन व मार्कंडेय कथा असे निरूपण होणार आहे.