नृसिंहवाडी  तीर्थक्षेत्रास पर्यटन अंतर्गत तीन कोटी मंजूर

नृसिंहवाडी तीर्थक्षेत्रास पर्यटन अंतर्गत तीन कोटी मंजूर

नृसिंहवाडी तीर्थक्षेत्राला तीन कोटी मंजूर
नृसिंहवाडी ता. २५ ः प्रादेशिक पर्यटन विकास योजना २०२२-२३ अंतर्गत तीर्थक्षेत्र नृसिंहवाडीच्या विकासासाठी तीन कोटी निधी मंजूर झाला. यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रयत्न केले.
येथील पर्यटन स्थळाला अधिकाधिक पायाभूत सुविधा देण्यासाठी या निधीचा विनियोग केला जाईल. यामध्ये बहुमजली पार्किंगजवळ दुकानगाळे व यात्री निवास बांधण्यासाठी एक कोटी रुपये, गेस्ट हाऊसशेजारी यात्री निवास बांधण्यासाठी ७० लाख रुपये, जोशी भोजनालयजवळ काँक्रिटीकरण व चारचाकी पार्किंगसाठी ८० लाख रुपये तर माहेश्वरी मंगल कार्यालयालगत बनभागात दुचाकी पार्किंगसाठी ५० लाखांचा निधी मंजूर केला. भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडीत अधिकाधिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणे गरजेचे होते.‌ पर्यटन विभागामार्फत मंजूर झालेल्या निधीमुळे नृसिंहवाडीचा चेहरामोहरा बदलणार आहे. यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे विशेष आभार मानले.‌

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com