Sun, Sept 24, 2023

नृसिंहवाडी येथे तीन भाविकांना वाचवले
नृसिंहवाडी येथे तीन भाविकांना वाचवले
Published on : 10 May 2023, 7:00 am
नृसिंहवाडीत नदीत बुडणाऱ्या
तीन भाविकांना नावाड्यांनी वाचविले
नृसिंहवाडी, ता.१०ः येथे दत्त दर्शनासाठी आलेले अमरावती येथील भाविक कृष्णा नदीत स्नान करताना पाण्यात बुडत होते. त्यांना नावाडी अरुण गावडे व दशरथ शिकलगार यांनी उडी मारून वाचविले. अमरावती येथील भाविक धनश्री रविंद्र पाचंगे (वय १६), भूमी शिवाजी शिंपी(वय १८) व एक तरुण कृष्णा नदीत स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले. तेंव्हा गावडे व शिकलगार या नावाड्यानी त्यांना वाचविले .