जवान शहीद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जवान शहीद
जवान शहीद

जवान शहीद

sakal_logo
By

NSK22G31137
PNH22B03684 - संतोष गायकवाड
जवान गायकवाड यांना
सिक्कीममध्ये वीरमरण
नाशिक, ता. २५ : लहवित (ता. नाशिक) येथील रहिवासी आणि लष्कराच्या तोफखाना विभागात सिक्कीममध्ये कार्यरत असलेले लान्स नायक संतोष विश्वनाथ गायकवाड यांना वीरमरण आले. आसाममधील लंका येथे ते ड्यूटीवर असताना ही घटना घडली. गायकवाड यांच्या पार्थिवावर लहवित येथे लष्करी इतमामात बुधवारी (ता.२६ ) सकाळी नऊच्या सुमारास अंत्यसंस्कार होणार आहेत. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड लंका (जि. होजाई, आसाम) येथे कार्यरत होते. हा सर्व भाग बर्फाळ आहे. अतिशय कडाक्याची थंडी येथे असते. कधी कधी तर उणे १५ ते २० म्हणजेच रक्त गोठविणारी थंडी असते. या कडाक्याच्या थंडीतच गायकवाड यांची तब्येत बिघडली. त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, तीन मुली, मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे. येथील देवळालीच्या महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी होते. सुटीवर आल्यावर ते महाविद्यालयास भेट देत असत. एअरमन म्हणून ते कॉलेजमध्ये प्रसिद्ध होते.