Sun, June 4, 2023

तब्बल २० लाखाची लाच घेताना दोघे ताब्यात… तालुका सहाय्यक निबंधकाचा समावेश
तब्बल २० लाखाची लाच घेताना दोघे ताब्यात… तालुका सहाय्यक निबंधकाचा समावेश
Published on : 29 March 2023, 7:07 am
वीस लाखांच्या लाचप्रकरणी
सहायक निबंधकासह दोघे ताब्यात
नाशिक, ता. २९ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज गेल्या काही वर्षातील मोठी कारवाई केली असून तालुका सहायक निबंधकास एका वरिष्ठ लिपिकाला तब्बल २० लाखांची लाच घेताना (ता.२९) पकडले. एसीबीच्या पथकाने रात्री उशिरा ही कारवाई केली. ‘एसीबी’ने सांगितले, की सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी सहायक निबंधकाने २० लाखांची लाच मागितली होती. या सर्व प्रकारात वरिष्ठ लिपिकाचाही सहभाग होता. या संदर्भात एसीबीकडे तक्रार आली. त्यानंतर एसीबीच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री सापळा रचला. त्यात या दोघांना २० लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले. कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.