माजी आमदार राजन पाटील १० तर प्रशांत परिचारक २ जागा मागत होते, त्यामुळेच निवडणूक लढण्याचा निर्धार केला खा महाडिक. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी आमदार राजन पाटील १० तर प्रशांत परिचारक २ जागा मागत होते, त्यामुळेच निवडणूक लढण्याचा निर्धार केला खा महाडिक.
माजी आमदार राजन पाटील १० तर प्रशांत परिचारक २ जागा मागत होते, त्यामुळेच निवडणूक लढण्याचा निर्धार केला खा महाडिक.

माजी आमदार राजन पाटील १० तर प्रशांत परिचारक २ जागा मागत होते, त्यामुळेच निवडणूक लढण्याचा निर्धार केला खा महाडिक.

sakal_logo
By

04016-१
टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) ः येथील भीमा कारखाना कार्यस्थळावर मंगळवारी (स्व.) भीमराव महाडिक यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सर्व नेते मंडळी व नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला.

म्हणून निवडणूक लढवण्याचा केला निर्धार
धनंजय महाडिक; राजन पाटलांकडून १० तर परिचारकांची दोन जागांची होती मागणी

सकाळ वृत्तसेवा
मोहोळ, ता. १६ ः भीमा कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले होते. आपण प्रयत्न करावा, तुमचा शब्द माजी आमदार प्रशांत परिचारक व माजी आमदार राजन पाटील यांच्यासाठी प्रमाण आहे; मात्र परिचारक यांनी दोन जागा मागितल्याचे श्री. फडणवीस यांनी मला सांगितले. त्यांचे स्वतःचे कारखाने असताना आमच्या कारखान्यावर त्यांची नजर का? म्हणून मग मी जागा देणार नसल्याचे ठासून सांगितले. दरम्यान, संबंधिताशी विचार विनिमय करून मी दोन जागेचा शब्दही माजी आमदार परिचारक यांना दिला. मला परिचारकांनी सायंकाळी फोन करून सांगितले की, माझी काही हरकत नाही; परंतु माजी आमदार राजन पाटील दहा जागा मागत आहेत. त्यावर ते ठाम आहेत. त्यामुळे निवडणूक लढण्याचा आम्ही निर्णय घेतल्याचा गौप्यस्फोट भीमा कारखान्याचे माजी अध्यक्ष व खासदार धनंजय महाडिक यांनी आज येथे केला.

टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार्य केलेल्या पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा तालुक्यातील नेते मंडळींचा सन्मान व नूतन संचालकांचा सत्कार झाला. त्यावेळी महाडिक बोलत होते. ते म्हणाले, ‘या सर्व गोष्टीचा उल्लेख मी निवडणुकीच्या कालावधीत मुद्दाम केला नाही. सभासदांनी एकतर्फी पुन्हा सत्ता आमच्या हातात दिल्याने आमच्या सर्व संचालक मंडळाची जबाबदारी वाढली आहे. वर्षभरात कारखान्यावर प्रतिदिन दीड लाख लिटर उत्पादन क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित करून सभासदांना दिलेला शब्द खरा करणार आहे. या निवडणुकीत एकमेव तरुण चेहरा असलेले नूतन संचालक विश्वराज महाडिक अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातील पदवीप्राप्त युवक आहे. तो भारतात येईल का नाही याचीच मला खात्री नव्हती; मात्र तो अमेरिकेतून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्याने माझे निम्मे काम हलके केले. विरोधकांनी संस्थेसह सभासदांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास दिला आहे. निवडणूक विनाकारण लादली. निवडणूक लढविण्याचा आमचा निर्धार झाल्यानंतर प्रचारात विरोधकांची प्रचाराची पातळी खालावली. ती शेतकऱ्यांना रूचली नाही. आमची प्रचाराची पातळी वाढत गेली. आम्ही नवे व्हिजन घेऊन सभासदांसमोर गेलो होतो.’
यावेळी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, माजी अध्यक्ष भगीरथ भालके, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, माजी उपसभापती मानाजी माने, सतीश काळे, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सतीश जगताप, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आदींसह शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डोक्यावर पुन्हा आली टोपी
पापरी (ता. मोहोळ) येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिगंबर माळी यांनी विचारविनिमय सभेत भीमा परिवाराची सत्ता पुन्हा येत नाही, तोपर्यंत टोपी घालणार नाही, असा निर्धार केला होता. आता भीमा परिवाराची पुन्हा सत्ता आल्याने खासदार महाडिक यांच्या हस्ते त्यांच्या डोक्यावर पुन्हा सर्वांसमक्ष टोपी घालण्यात आली.