येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकीत विरोधकांचा हिशोब चुकता करू, सोलापूरचे पालकत्व स्वीकारण्याची तयारी, खा महाडिक. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकीत विरोधकांचा हिशोब चुकता करू, सोलापूरचे पालकत्व स्वीकारण्याची तयारी, खा महाडिक.
येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकीत विरोधकांचा हिशोब चुकता करू, सोलापूरचे पालकत्व स्वीकारण्याची तयारी, खा महाडिक.

येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकीत विरोधकांचा हिशोब चुकता करू, सोलापूरचे पालकत्व स्वीकारण्याची तयारी, खा महाडिक.

sakal_logo
By

०४०४६
टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) ः येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे नूतन अध्यक्ष विश्वराज महाडिक व नूतन उपाध्यक्षपदी सतीश जगताप यांच्यासोबत खासदार धनंजय महाडिक.

‘भीमा’च्या अध्यक्षपदी विश्र्वराज महाडिक
सकाळ वृत्तसेवा
मोहोळ, ता. २४ ः टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी विश्वराज धनंजय महाडिक, तर उपाध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा सतीश नरसिंह जगताप यांची आज बिनविरोध निवड केली.
जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी प्रक्रिया पूर्ण केली. अध्यक्षपदासाठी विश्वराज महाडिक, तर उपाध्यक्षपदासाठी सतीश जगताप या दोघांचेच अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाली. दोघांचा विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. यावेळी विश्वराज म्हणाले, ‘‘जे मला शाळेत शिकायला मिळाले नाही, ते गेल्या साडेतीन वर्षांत कारखान्याच्या माध्यमातून शिकायला मिळाले. गेल्या दोन वर्षांपासून कारखान्यासह खासदार धनंजय महाडिक यांना खूप त्रास दिला गेला. निवडणूक लावण्याची गरज नव्हती. केवळ द्वेषाचे राजकारण केले; परंतु आम्ही ते या निवडणुकीच्या माध्यमातून मोडून काढले. मला कारखान्याबद्दल श्रद्धा आहे. मी विरोधकांचेही प्रतिनिधित्व करायला तयार आहे. सभासदांची सेवा म्हणजेच वडीलधाऱ्यांची सेवा, असे मी मानतो. मी स्व. भीमरावदादांचा पठ्ठा आहे. माझ्याकडून काम करून घ्या. पुढे चालतच राहायचे, या वडील खासदार महाडिक यांनी दिलेल्या कानमंत्राचे पालन करीन.’’
यावेळी खासदार महाडिक म्हणाले, ‘‘एक २६ वर्षांचा तरुण, तसेच महाडिकांच्या तिसऱ्या पिढीतला अध्यक्ष होतो, हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे. विश्र्वराज एक कोटी रुपयाची नोकरी सोडून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आले. धाडस हे आमच्या कुटुंबाचा गुण आहे. जो धाडस करतो, त्याच्या पाठीशी ब्रह्मांड उभे राहते. गेल्या सहा महिन्यांपासून मी बारकाईने विश्वराज यांच्या कामाचे निरीक्षण केले. ते माझ्या निकषाला उतरले म्हणून त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. उपाध्यक्ष सतीश जगताप कायम माझ्या पाठीशी बंधूप्रमाणे उभे राहिले. नवीन अध्यक्षांचा इथेनॉल प्रकल्प, स्पिरीट व मोलॅसिसपासून गॅसनिर्मिती हा अजेंडा राहणार आहे. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकात विरोधकांचा हिशेब चुकता करू.’’
यावेळी कृष्णराज महाडिक, अरुंधती महाडिक, विनोद महाडिक, पवन महाडिक, सुजित महाडिक, विश्वास महाडिक, मनीषा महाडिक, सोनाली महाडिक, मोनाली महाडिक, तेजस्विनी कदम, सुवर्णा महाडिक, प्रियदर्शनी महाडिक, अशोक क्षीरसागर, शिवाजीराव काळुंगे आदींसह परिसरातील भीमा परिवाराचे कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विश्वराज अध्यक्ष झाले, ही आमच्या कुटुंबासाठी आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांनी केवळ दीड वर्षात आघाडी घेतली आहे. त्यांना कष्टाचे फळ मिळाले.
- अरुंधती महाडिक, विश्वराज महाडिक यांच्या मातोश्री