फलटण शहर - उपजिल्हा रुग्णालयात मोडतोड

फलटण शहर - उपजिल्हा रुग्णालयात मोडतोड

वैद्यकीय अधिकाऱ्याकडून
नशेत रुग्णालयाची तोडफोड
फलटणमधील प्रकार
फलटण शहर, ता. २५ : येथील उपजिल्हा रुग्णालयात एका वैद्यकीय अधिकाऱ्यानेच मंगळवारी रात्री दारूच्या नशेत चांगलाच धिंगाणा घालून शासकीय मालमत्तेची तोडफोड केली. फलटण शहरात मध्यवर्ती भागात पंचायत समितीच्या इमारतीस खेटूनच असणारे उपजिल्हा रुग्णालय तेथील कारभारामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. मंगळवारी रात्री वैद्यकीय अधिकाऱ्याने दारूच्या नशेत जिल्हा उपरुग्णालयात तेथील कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावाने शिमगा केला. त्यांनी रुग्णालयातील दारे, खिडक्यांच्या काचांची तोडफोड केली व दारांचीही मोडतोड केली. या प्रकाराने रुग्णालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आपल्या वादग्रस्त कार्यशैलीमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरलेल्या या अधिकाऱ्यास रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारीही वैतागले आहेत. रुग्णालयाचीच तोडफोड व मोडतोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान करूनही या अधिकाऱ्यावर गुन्हा अद्याप दाखल करण्यात आलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com