
पोहाळे दूध संस्था निवडणूक..
सत्ताधारी समर्थ पॅनेलचा विजय
पोहाळे तर्फ आळते ः येथील केदारलिंग सहकारी दूध संस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी समर्थ पॅनेलने सर्व ११ जागा जिंकून सत्ता कायम ठेवली, तर विरोधी परिवर्तन गाव विकास आघाडीला एकाही जागेवर यश मिळविता आले नाही. विजयी उमेदवार असे ः शिवाजी यशवंत कटकर, कृष्णात मारुती बेनाडे, विलास बाळकृष्ण पोवार, कृष्णात रंगराव मोटे, भिवाजी मारुती पोवार, कुंडलिक आकाराम पाटील, वैभव बाळासो डवरी, जोतिराम राजाराम चौगले (बिनविरोध), अशोक भिवा मोरे, रेखा नामदेव कोले, मालूबाई दगडू बोरचाटे. अथर्वा गाताडे (लेखापाल, दुग्ध विभाग) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहिले. आमदार डॉ. विनय कोरे यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलच्या विजयासाठी समर्थ समूहाचे अध्यक्ष नामदेव शिंदे, संभाजी गणपती पाटील, विश्वास श्रीपती काटकर, बी. एस. पोवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भिवाजी शामराव काटकर यांनी परिश्रम घेतले.
Web Title: Todays Latest Marathi News Phj22b01015 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..