पोहाळेत महाराजस्व अभियान.. तीन गावच्या लोकांनी घेतला लाभ.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोहाळेत महाराजस्व अभियान.. तीन गावच्या लोकांनी घेतला लाभ..
पोहाळेत महाराजस्व अभियान.. तीन गावच्या लोकांनी घेतला लाभ..

पोहाळेत महाराजस्व अभियान.. तीन गावच्या लोकांनी घेतला लाभ..

sakal_logo
By

१९१७

पोहाळेत ‘महाराजस्व’ अभियान
तीन गावच्या लोकांनी घेतला लाभ; विधवा महिलांच्या हस्ते उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
पोहाळे तर्फ आळते, ता. १८ ः ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून आयोजित ‘महाराजस्व’ शिबिरास पन्हाळा तालुक्यातील पोहाळे तर्फ आळते, कुशिरे, गिरोली ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. ‘महाराजस्व’ अभियानांतर्गत उपक्रम राबविला. शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती, मंजूर प्रस्ताव व दाखले वितरित केले. शिबिराचे उद्‍घाटन पाच विधवा महिलांच्या हस्ते केले. नायब तहसीलदार विनय कौलवकर, अस्लम जमादार, श्रीमती दया शिंदे (पवार), तालुका पुरवठा अधिकारी मुकुंद लिंगम, तालुका कृषी अधिकारी श्री चव्हाण, ‘महावितरण’चे कार्यकारी अभियंता राजे प्रमुख उपस्थित होते.
शिबिरामध्ये नवीन रेशन कार्ड, आधार कार्ड, सात-बारा उताराबाबतची कामे, संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मंजूर प्रस्ताव वाटप, ‘नगर भूमापन’ची कामे, जिल्हा बँक व वारणा बँकेने ग्रामीण जनतेसाठी असलेल्या योजनांची माहिती, ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनी वीज जोडणी मागणीबरोबरच बिलांबाबत असलेल्या तक्रारींचे निराकरण, पोस्ट खात्याने विविध बँकिंग सुविधांचीही माहिती, वन विभागातील योजनांची माहिती, आरोग्य विभागामार्फत लसीकरण, पशुवैद्यकीय विभागामार्फत जनावरांचे लसीकरण आदी सुविधा पुरवल्या. ‘नगर भूमापन’मार्फत वारस नोंद अर्ज स्वीकारण्यात आले.
उपक्रमाला मंडल अधिकारी प्रकाश वरक, तलाठी सुवर्ण कराड, श्रीधर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिर यशस्वी होण्यासाठी सरपंच दादासो तावडे, कुशिरेच्या सरपंच अनुराधा घोरपडे, गिरोलीचे सरपंच मधुकर कांबळे, पोलिस पाटील मोहन कदम, सुहास पाटील, संदीप माळवी, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश बेनाडे, सीताराम चौगले, निवास ढोले, आनंदा पोवार, पंडित पोवार, विष्णू पाटील, बाबासाहेब माने, इंद्रायणी चौगले, बळिराम मिसळ, उमेश कुंभार, आनंद राजहंस, गणेश बोरचाटे, सर्जेराव चौगले, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, तरुण मंडळांचे व विविध संस्थांचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Phj22b01054 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top