
जोतिबावरील वातावरणाची मुंबईच्या पर्यटकांना भूरळ..
जोतिबावरील वातावरणाची
भाविक, पर्यटकांना भूरळ
निवास मोटे ः सकाळ वृत्त सेवा
जोतिबा डोंगर ता. १४ ः श्री क्षेत्र जोतिबा डोंगर हे ठिकाण समुद्री सपाटीपासून उंचीवर आहे. येथे नेहमी शुद्ध हवा, जोरदार वारे, बोचणारी थंडी दाट धुके हे वातावरण असते. काश्मीर सारखे हे वातावरण पावसाळ्यात पहावयास मिळते. याच वातावरणाची भुरळ बेळगाव, पुणे, मुंबई, सातारा, सांगली या भागातील भाविक, पर्यटकांना पडली आहे. या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी गर्दी होत आहे. रविवारी भाविक दिवसभर या वातावरणाचा आनंद घेतात. पावसाळ्यात सतत पावसाची रिप रिप तसेच दाट धुके असते. पर्यटक व भाविकांना हे वातावरण अनोळखी असते. पर्यटक परिवारासह चिंब भिजून येथील दाट धुके पावसाचा आनंद लुटतात. येथील दक्षिण दरवाजा (विजय दरवाजा ) येथे तर अति शुद्ध हवा येते. काही भाविक, पर्यटक योगासने, प्राणायाम करतात. या एकमेव ठिकाणाहून धुक्याचे लोट येता दिसतात. पन्हाळा गडाचे दर्शन या ठिकाणाहूनच होते. या ठिकाणाहून पर्यटक पंचगंगा नदीचा महापूर पाहतात तसेच रात्रीच्या वेळी तर प्रकाशमय असे कोल्हापूर शहर पहावयास मिळते.
ज्योतिबावरील चव्हाण तळ्याच्या परिसरातून पुढे कोल्हापूरच्या दिशेने गेल्यावर एका दिशेला भाविक पर्यटक थांबलेले सर्रास आढळतात. कारण या ठिकाणाहून पन्हाळा गडाचे अगदी थेट समोरून दर्शन होते. आपल्या कुटुंबासमवेत सेल्फी फोटो घेण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. यमाई मंदिराच्या पुढे गेल्यावर नागमोडी वळणाचा हिरवागार घाट दिसतो. तिथून पुढे गेल्यावर वारणानगरचा परिसर स्पष्ट दिसतो. येणारे पर्यटक भाविक जोतिबाचे हे आगळे वेगळे निसर्गरम्य वातावरण पाहून प्रफुल्लित होतात. जोतिबा दर्शना बरोबरच त्यांचे वर्षा पर्यटनही घडते.
कोट
जोतिबा डोंगर हा पावसाळ्यात धुक्यात लपटलेला दिसतो. अगदी काश्मीरसारखे हुबेहूब वातावरण पहावयास मिळते .दरवर्षी आम्ही परिवारासोबत येथील पावसाळी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येतो. या ठिकाणी मिळणारा बासुंदी चहा थंडी दूर करतो. पुरणपोळी व कटाची आमटी तर खूप चविष्ट आहे.
-अविनाश टवळ, पर्यटक, भाविक, मुंबई
Web Title: Todays Latest Marathi News Phj22b01068 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..