
जोतिबावरील यात्री निवास बंद.. भाविक,पर्यटकांची गैरसोय..
01948
जोतिबा डोंगर ः येथील अद्यावत यात्री निवास तीन महिन्यापासून बंद आहे.
जोतिबावरील यात्री निवास बंद
पर्यटक, भाविकांची अडचण; नुतनीकरण करण्याची गरज
निवास मोटे ः सकाळ वृत्तसेवा
जोतिबा डोंगर ता. १७ ः श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे सव्वा कोटी रुपये खर्च करुन बांधलेले आद्यावत यात्री निवास मे महिन्यापासून बंद आहे. परिणामी, डोंगरावर येणाऱ्या पर्यटक व भाविकांची अडचण झाली आहे. त्यांना राहण्यासाठी थेट पन्हाळा, कोल्हापूर गाठावे लागत आहे. जोतिबाची श्रावणषष्ठी यात्रा तीन ऑगस्टला आहे. या यात्रेपूर्वी तरी हे यात्री निवास खुले होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जोतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविक व पर्यटकांना रात्रीच्या वेळी राहण्यास धर्मशाळा किंवा निवासाची सोय व्हावी यासाठी पर्यटन विकास महामंडळ व राज्य शासनाने सुंदर जोतिबा योजनेतून परिसर विकास समितीच्या वतीने अद्यावत यात्री निवास बांधले आहे. या यात्रेनिवासची इमारत पंचवीस हजार चौरस फुटांची असून,बांधकाम व इतर खर्च सव्वा कोटीपर्यंत गेला आहे. इमारतीत सामान्य भाविक, विद्यार्थ्यांसाठी सभागृह बांधले आहे .अनेक विशेष शासकीय अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्रपणे सोळा खोल्या आहेत. पहिले मजल्यावर सर्व सुविधांसह सभागृह रेस्टॉरंट, डायनिंग हॉल किचन रुम एकाच वेळी ७५ लोकांची बसण्याची व्यवस्था आहे . सर्वसामान्य, मध्यमवर्गीय लोकांच्यासाठी निवासाची व्यवस्थित आहे. जोतिबा गावापासून कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावर चव्हाण तळ्यानजिक निवांतस्थळी ही इमारत बांधली असून, या ठिकाणी शुद्ध हवा आहे. झाडे झुडपेही भरपूर आहेत .
ठेकेदाराचा करार संपला म्हणून हे यात्री निवास बंद असल्याचे सांगण्यात येते. परंतु, या यात्रेनिवासची सध्या बऱ्यापैकी दुरवस्था झाली असून लोखंडी साहित्य गंजले आहे .काही ठिकाणी गळती लागली आहेत. त्यामुळे या यात्री निवासचे नुतनीकरण करणे गरजेचे आहे.
कोट
जोतिबावरचे यात्री निवास बंद आहे. आम्हा भाविकांची गैरसोय होत आहे. गेल्या आठवडयात आम्हाला मुक्काम करण्यासाठी कोल्हापूला जावे लागले. हे यात्री निवास तत्काळ सुरु करावे.
-वैभव सावंत, भाविक पुणे
Web Title: Todays Latest Marathi News Phj22b01073 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..