पान १०२ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान १०२
पान १०२

पान १०२

sakal_logo
By

02028
02029

जोतिबा डोंगर ः येथे खंडेनवमीनिमित्त मंगळवारी निघालेला जोतिबाचा पालखी सोहळा. दुसऱ्या छायाचित्रात नवव्या दिवशी जोतिबाची श्रीकृष्ण रुपातील महापूजा बांधली. (छायाचित्र ः निवास मोटे)

‘चांगभलंऽऽ’च्या गजरात जोतिबाचा
पहिला पालखी सोहळा

गुलाल-खोबऱ्याची उधळण; मंदिरांत दिवे ओवाळणीही

जोतिबा डोंगर, ता. २७ ः ‘जोतिबाच्या नावानं चांगभलंऽऽ’चा जयघोष आणि गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत येथील जोतिबा मंदिरात आज सकाळी नऊ वाजता खंडेनवमीनिमित्त पहिला पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. पहाटे दिवे ओवाळणीचा सोहळा झाला. शारदीय नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी जोतिबाची श्रीकृष्ण रुपातील महापूजा बांधली. पालखी सोहळ्याला सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजीराव सांगळे, देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवडे, सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, ग्रामविकास अधिकारी जयसिंग बीडकर, पुजारी, ग्रामस्थ, देवसेवक, देवस्थान समितीचे अधीक्षक दीपक मेहतर व दहा गावकरी, कर्मचारी, भाविक, मानाचे उंट, घोडा व लावाजमासह पालखी सोहळ्यात सहभागी झाले. दुपारी बारा वाजता धुपारती सोहळा मुख्य मंदिरात आला. त्यानंतर प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली. उद्या विजयादशमीनिमित्त सायंकाळी जोतिबा देवाची अंबारीतील महापूजा बांधण्यात येईल. सायंकाळी सहा वाजता दक्षिण दरवाजावर सीमोल्लंघनाचा पारंपरिक सोहळा होणार आहे

पालखी सोहळ्याला
पोलिस बँडची मानवंदना
जोतिबाचा चार महिने बंद असणारा पालखी सोहळा परंपरेनुसार खंडेमहानवमीपासून सुरू होतो. या पालखी सोहळ्यास भारत राखीव बटालियन ३, कोल्हापूर (IRB) या बटालियनची पोलिस बँडची मानवंदना दिली. यासाठी पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, जिल्हा समादेश पुरुषोत्तम पाटील, सेवानिवृत्त पोलिस उपाधीक्षक आर. आर. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.