‘नेचर वॉक’मधून दुर्मिळ वृक्ष, वनौषधींची ओळख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘नेचर वॉक’मधून दुर्मिळ वृक्ष, वनौषधींची ओळख
‘नेचर वॉक’मधून दुर्मिळ वृक्ष, वनौषधींची ओळख

‘नेचर वॉक’मधून दुर्मिळ वृक्ष, वनौषधींची ओळख

sakal_logo
By

02054
पोहाळे तर्फ आळते (ता. पन्हाळा) : येथील डोंगर पठारात दुर्मिळ वनसंपदा, वनौषधींची ओळख करून घेताना ग्रामस्थ, निसर्ग मित्र, पर्यावरणप्रेमी. (छायाचित्र : निवास मोटे)

‘नेचर वॉक’मधून दुर्मिळ वृक्ष, वनौषधींची ओळख
पोहाळे तर्फ आळते येथे आयोजन; निसर्ग मित्र ग्रुपचा पुढाकार
निवास मोटे : सकाळ वृत्तसेवा
जोतिबा डोंगर ता. १० : गावालगतच्या जंगलातील दुर्मिळ वृक्षसंपदा, औषधी वनस्पती, वेली, फळझाडे, कंदमुळे, रानभाज्यांची ओळख झाल्याने पोहाळे तर्फ आळते (ता. पन्हाळा) येथील ग्रामस्थ भारावून गेले. जैवविविधतेच्या अभ्यासातून पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी ‘नेचर वॉक’ या नावीण्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन निसर्ग मित्र ग्रुपने केले होते.
वनस्पती शास्त्रज्ञ व पर्यावरण तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर, आयुर्वेदाचे अभ्यासक डॉ. अशोक वाली यांनी विविध वनस्पती ओळख, शास्त्रीय माहिती व फायदे सांगितले. तसेच या वृक्षांचे मराठी नाव, इंग्रजी नाव, त्यांचा बहरण्याचा कालावधी, इतरत्र कुठे आढळते, त्यांचे औषधे उपयोग, जंगल कसे बघावे, भटकंती कुठे करावी, काय काळजी घ्यावी आदींची शास्त्रीय माहिती सांगितली.
या ‘नेचर वॉक’ उपक्रमात सरपंच, उपसरपंच कोडोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, अनिल वेल्हाळ, चंद्रकांत निकाडे, सुरेश बेनाडे, डॉ. विठ्ठल पाटील, संजय कळके, पक्षी अभ्यासक सत्याल गंगलमाले, अभिषेक शिर्के, सीताराम चौगले, भिवाजी काटकर, दीपक जगदाळे, राजाराम पाटील, श्रीकांत पाटील, गजानन गुरव, केदारी बोरचाटे, भालचंद्र कोतेकर, प्रमोद माजगांवकर, शिवम पाटील, विशाल पाटील, शिवाजी मिसाळ, संजय पोवार, संग्राम गायकवाड, संदीप तांबवेकर यांच्यासह पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
या वेळी जंगलातील मेहंदी, गुळवेल, अक्कलकारा, कोरांटी, सीताफळ, रामफळ, रानभेडी, बोगनवेल, खाजकोयली, शिसव, निलगिरी, भारंगी, कटकी, पांगिरा, कळलावी, दहीपळस, हेळा, बेहडा, मालकागुंनी, कांजीरीयारेडी, कांचन, वारस, भुईगेंद, रानद्राक्ष, रानहळद, बिब्बा, मोहोर गौरी, एरंड मुगली, आघाडा, करंजी, घाणेरी, कपाळभोडी, मोरशेड, टाकळा, नाल, डुक्करकंद, धामण, बहावा, पळस, शेंद्री, काटेसावर, शिसम, गारवेल, करवंद, खाज कोयली, तिपाणी, अनंतवेल, घायटी, खोटा चंदन, गुळवेळ, कुंकूफळ, बळलावी, रानद्राक्षे, मालकंगोणी, सुरण, काळी मुसळी, दिंडा, गुंज, शतावरी, कंदिलफुल, कासटी, मुरुडशेग यांच्यासह अनेक औषधी वनस्पती, तृणपुष्पे, रानभाज्या यांची माहिती डॉ. मधुकर बाचूळकर व प्रा. डॉ. अशोक वाली यांनी सांगितली.