Sun, Feb 5, 2023

राधाकृष्ण दूध संस्था दूध संस्था कळके अध्यक्ष..
राधाकृष्ण दूध संस्था दूध संस्था कळके अध्यक्ष..
Published on : 14 December 2022, 1:49 am
सुरेश कळके 02075
रंजना लोहार 02074
राधाकृष्ण दूध संस्थेचे कळके अध्यक्ष
पोहाळे तर्फ आळते ः कुशिरे तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील श्री राधाकृष्ण सहकारी दूध संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश प्रल्हाद कळके तर उपाध्यक्षपदी रंजना जोतिराम लोहार यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी ए. ए. चिकणे होते. संस्थेच्या निवडणुकीत प्रकाश माने, निवास ठाणेकर यांच्या सत्तारुढ राजर्षी शाहू विकास आघाडीने दहा जागा जिंकून सत्ता कायम ठेवली तर विरोधी गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले. अध्यक्ष निवडीवेळी नूतन सदस्य प्रकाश माने, महादेव माने, लक्ष्मण कळके विष्णू खांडेकर, धनाजी चोपदार, संदीप गुरव, शिवाजी कांबळे, मनीषा घोरपडे, रेखा कळके आदी उपस्थित होते. पांडुरंग पाटील यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे सचिव दिलीप कळके यांनी आभार मानले.