जोतिबा खेट्यांची सांगता

जोतिबा खेट्यांची सांगता

02154, 02155

जोतिबा डोंगर ः दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची रविवारी शेवटच्या खेट्यास बांधलेली महापूजा. दुसऱ्या छायाचित्रात दर्शनासाठी झालेली भाविकांची गर्दी.
(निवास मोटे, सकाळ छायाचित्रसेवा)
............


जोतिबा डोंगरावर खेट्यांची सांगता

दोन लाख भाविकांची उपस्थितीः डोंगरास मिनी यात्रेचे स्वरूप

सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर ता.५ः ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’, ‘यमाईदेवी, चोपडाईदेवी नंदी महादेव बद्रिकेदार काळभैरव देवाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथे आज परंपरेनुसार खेट्यांची सांगता झाली. महाराष्ट्र ,कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश या राज्यातील सुमारे दोन लाख भाविकांनी आज डोंगरावर हजेरी लावली. गर्दीमुळे आज मिनी डोंगरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.
माघ पौर्णिमा ते फाल्गुन पौर्णिमेच्या पूर्वी येणाऱ्या रविवारी शेवटचा खेटा करण्याची परंपरा असून यामध्ये कधी चार तर कधी पाच रविवार येतात. काही भाविक पाच खेटेही करतात. उद्या होळी पौर्णिमेचा सण असल्यामुळे कोल्हापूरच्या बहुतांशी भाविकांनी आज पुजाऱ्यांच्या घरी नैवेद्य करण्यासाठी गर्दी केली होती. आज मुख्य मंदिरात पाद्यपूजा काकडआरती व मंगल पाठ झाले. त्यानंतर केदार कवच, केदार महिमा, केदार स्तोत्र या विधींचे पठण झाले. सकाळी नऊ वाजता श्री जोतिबा देवाची अंलकारीक महापूजा बांधण्यात आली. दुपारी बाराला धुपारती सोहळा झाला. शेवटच्या खेट्याच्या निमित्ताने कोल्हापुरातील अनेक भाविकांनी पंचगंगा नदीकाठी स्नान करून डोंगराकडे येण्यास प्रारंभ केला. डोंगर भागातील पायवाटा या गर्दीने फुलून गेल्या. चांगभलंच्या जयघोषाने गायमुख परिसर दणाणून गेला. आज डोंगरावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार डोईजड बंदोबस्ताच्या नियोजनासाठी शनिवारपासून डोंगरावर तळ ठोकून होते . आज देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवडी यांनी डोंगरावर येऊन पाहणी केली. रात्री भव्य पालखी सोहळा झाला. यावेळी सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजीराव सांगळे, देवस्थान समितीचे अधीक्षक दिपक म्हेतर, सिंदिया देवस्थानचे अजित झुगर, देवसेवक ,ग्रामस्थ पुजारी उपस्थित होते
.......

चैत्र यात्रा ५ एप्रिल रोजी

जोतिबा देवाची चैत्र यात्रा ५ एप्रिल रोजी होत आहे . येत्या आठवड्याभरात यात्रेच्या तयारीस सुरुवात होईल. सुरुवातीला शासकीय अधिकारी, ग्रामस्थ, पुजारी, सासनकाठी प्रतिनिधी यांच्या बैठका होतील. अंतिम बैठक जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांच्या उपस्थितीत होईल.
. . . . . .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com