जोतिबावर भाविक पर्यटकांची गर्दी .. सांयकाळी वळीव पावसाने तारांबळ

जोतिबावर भाविक पर्यटकांची गर्दी .. सांयकाळी वळीव पावसाने तारांबळ

02313

जोतिबा डोंगर ः येथे रविवारी पावसामुळे भाविकांची तारांबळ उडाली.
....

जोतिबावर पावसामुळे भाविकांची तारांबळ

जोतिबा डोंगर, ता. ७ः जोतिबाच्या नावानं चांगभलं.. च्या जयघोषात श्री क्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथे रविवारची यात्रा मोठ्या भक्तिमय व उत्साही वातावरणात झाली. सलग सुट्यांच्या निमित्ताने आज जोतिबा डोंगराला मिनी चैत्र यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. पण सांयकाळी अचानक आलेल्या वळीव पावसामुळे मात्र भाविकांची मोठी तारांबळ उडाली.
...
पन्हाळ गडावर धुवॉंधार
पन्हाळा ः यावर्षीच्या कडक उन्हाने घामेजलेल्या पन्हाळगडाला रविवारी पहिल्यांदाच धुवॉंधार वळीव पावसाने न्हाऊ घातले आणि गडावरच्या पांढऱ्या, तांबड्या आणि पिवळ्या शाडू मातीचा सुगंध आसमंतात दरवळला. ढगाळ वातावरणाचा आस्वाद घेणाऱ्या पर्यटकांनी सुरवातीच्या रिमझिम पावसात भिजण्याचा आनंद उपभोगला पण नंतर सुरू झालेल्या धुवॉंधार पावसाने आणि कडाडणाऱ्या विजेने पर्यटक ज्या त्या ठिकाणी आडोशाला थांबले. सुमारे पाऊण तास पाऊस झाला. पावसाने नेबापूर, आंबवडे, बोरपाडळे, मिठारवाडी, दाणेवाडी परिसरातील बळीराजा आनंदला असून रानात खरीपासाठी कष्टमशागत करण्यासाठी सज्ज झाला आहे.
....

बांबवडे परिसरात वळीवाची हजेरी

बांबवडेः शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे परिसरात वळवाने हजेरी लावली. दिवसभर उष्णतेमुळे हैराण झालेले नागरिक सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या पावसामुळे सुखावले. या पावसामुळे वातवरणात गारवा आला. दोन तास विद्युत प्रवाह खंडित ठेवण्यात आला होतो. या पावसामुळे धुळवाफ पेरणीपूर्वी मशागतीस शेतकऱ्यांना मदत होणार आहे.
...

देवाळे, पैजारवाडी परिसरात बळीराजा सुखावला

देवाळेः देवाळे, पैजारवाडी, जेऊरसह बांधारी परिसरात वळवाच्या पावसाने रविवारी धुवॉंदार हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास दोन तास पाऊस कोसळत होता. वळीव पाऊस पडल्यामुळे परिसरातील बळीराजा सुखावला. यामुळे शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग येणार आहे. पावसामुळे हवेत गारवा जाणवत होता.
...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com