जोतिबा डोंगर भाविक पर्यटकांनी गजबजला .. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोतिबा डोंगर भाविक पर्यटकांनी गजबजला ..
जोतिबा डोंगर भाविक पर्यटकांनी गजबजला ..

जोतिबा डोंगर भाविक पर्यटकांनी गजबजला ..

sakal_logo
By

02340, 02341

जोतिबा डोंगरः येथे रविवारी भाविकांची झालेली गर्दी व जोतिबा देवाची बांधलेली महापूजा.
...


लग्नसराई, सुट्यांमुळे जोतिबा डोंगर गजबजला

जोतिबा डोंगर ता. १४ ःश्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे मे महिन्याच्या सुट्या तसेच लग्न सराईच्या निमित्ताने आज जोतिबा डोंगराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. भाविकांच्या गर्दीने दिवसभर डोंगर गजबजला.
आज महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील सुमारे दीड लाख पर्यटक व भाविकांनी जोतिबा देवाचे दर्शन घेतले. पहाटे पाच वाजल्यापासून भाविक डोंगरावर दाखल होण्यास सुरुवात झाली. सकाळी दहा वाजता तर डोंगर हाऊसफुल्ल झाला.भाविकांनी मंदिर शिखर, पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण केली. मंदिरात सकाळी काकड आरती, मंगलपाठ, केदार स्त्रोत्र, केदार महिमा या विधींचे पठन झाले. सकाळी दहा वाजता जोतिबा देवाची अलंकारिक रूपातील महापूजा बांधण्यात आली.
आज दक्षिण दरवाजापर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. डोंगरावर आज बंदोबस्त कमी असल्याने महिला, वयोवृध्द, लहान मुले यांचे हाल झाले. यमाई मंदिर परिसर, शासकीय विश्रामगृह या भागात दिवसभर अनेक वेळा वाहतूक विस्कळीत होऊन मोठी कोंडी झाली. वाहतूक पोलिस जाग्यावर नसल्याने होमगार्डनी वाहतूक नियंत्रित केली.