Thur, Sept 21, 2023

जोतिबा डोंगरावर भाविक पर्यटकांची वर्दळ
जोतिबा डोंगरावर भाविक पर्यटकांची वर्दळ
Published on : 28 May 2023, 6:27 am
02346
जोतिबा डोंगर ः येथे रविवारी भाविकांची झालेली गर्दी .
...
जोतिबा डोंगरावर सुट्यांमुळे भाविकांची गर्दी
जोतिबा डोंगर ः श्री क्षेत्र जोतिबा डोंगर तथा वाडी रत्नागिरी येथे मे महिन्याच्या सुट्या तसेच लग्न सराईच्या निमित्ताने शनिवारपासूनच भाविक व पर्यटकांची मोठी वर्दळ आहे. भाविक दिवसभर डोंगरावर दर्शनाबरोबरच पर्यटनाचाही आनंद लुटत आहेत.
पहाटे पाच वाजल्यापासून भाविक डोंगरावर दाखल होण्यास सुरुवात झाली. मंदिरात सकाळी काकड आरती मंगलपाठ, केदार स्त्रोत्र, केदार महिमा या विधींचे पठन झाले. सकाळी दहा वाजता जोतिबा देवाची अलंकारिक रूपातील महापूजा बांधण्यात आली. आज दक्षिण दरवाजापर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. कोडोली पोलिस ठाण्याचे फौजदार मनोज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व्यवस्था तैनात होती.