जोतिबावर रविवारी सरता रविवार सोहळा ..

जोतिबावर रविवारी सरता रविवार सोहळा ..

जोतिबा डोंगरावर उद्या सरता रविवार

शेवटचा पालखी सोहळा ः चार महिन्यानंतर पुन्हा सुरू होणार पालखी

जोतिबा डोंगर, ता.२ः येथील श्री जोतिबा मंदिरात ४ जून रोजी सरता रविवारी व शेवटचा पालखी सोहळा होणार आहे. या निमित्ताने डोंगरावर सर्वत्र सरता रविवार हा पारंपारिक उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे.
या सोहळ्यासाठी महाराष्ट्र - कर्नाटकातील लाखाच्या पुढे भाविक येतील, असा अंदाज आहे. डोंगरावर ७ जून पूर्वी येणारा रविवार हा ‘सरता रविवार’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शेवटचा पालखी सोहळा रात्री साडेआठला होतो. संपूर्ण गावच या सोहळ्यासाठी हजर असते, म्हणून ‘सरता रविवार’ प्रसिद्ध आहे. त्यानंतर मात्र चार महिने पालखी सोहळा बंद असतो. तो पुन्हा खंडेनवमीला सुरू होतो. सरत्या रविवारी सर्व ग्रामस्थ, पुजारी नवीन कपडे परिधान करून मंदिरात येतात व मंदिरात सर्व देवतांना साखर -पेढे अर्पण करतात. नवस फेडण्यासाठी आलेले भाविक श्रींच्या पालखीवर मोठ्या प्रमाणात गुलाल खोबऱ्याची उधळण करतात. यानिमित्ताने डोंगरावर घरोघरी आमरस व पुरण पोळीचा नैवेद्य श्रींना दाखविण्यात येतो. या दिवशी विविधरंगी फुलांनी पालखी सजवली जाते व मंदिरात उंट, घोडे सजवून आणले जातात.
...

‘जोतिबा डोंगरावरील ग्रामस्थ पुजारी मोठ्या भक्तिभावाने सरता रविवार सोहळा साजरा करतात. डोंगरावर या सोहळ्यास पारंपरिक महत्त्व आहे. संपूर्ण गाव पालखी सोहळ्यास उपस्थित राहते.

नितीन लादे, पुजारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com