सरता रविवार जोतिबा ग्रामस्थांचा .. आख्या गावची पालखी सोहळ्याला हजेरी ..

सरता रविवार जोतिबा ग्रामस्थांचा .. आख्या गावची पालखी सोहळ्याला हजेरी ..

02360,
2359
...

जोतिबा डोंगरः येथे रविवारी रात्री नऊ वाजता सरता रविवार सोहळ्यानिमित्त झालेल्या पालखी सोहळ्यात संपूर्ण जोतिबा गाव दाखल झाले.
जोतिबा देवाची बांधण्यात आलेली महापूजा. (निवास मोटे, सकाळ छायाचित्रसेवा)
......


अख्ख्या गावाची पालखी सोहळ्याला हजेरी

जोतिबा डोंगरावर सरता व पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात

जोतिबा डोंगर, ता. ४ ः वर्षभर भाविकांच्या सेवेत असणारे जोतिबा डोंगर येथील पुजारी ग्रामस्थ आज मात्र सरता रविवार व पालखी सोहळा यानिमित्ताने एकत्र आले आणि सर्वांनी मिळून पालखी सोहळ्याचा आनंद लुटला. संपूर्ण गावच या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित झाले होते. आजचा हा सोहळा भाविकांनी पाहिला आणि तेही भारावून गेले.
एरवी भाविकांच्या सेवेसाठी पुरणपोळ्या लाटणाऱ्या जोतिबावरील महिला भगिनी आज पालखी सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या. येथील ग्रामस्थांनी साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. पुरणपोळ्या लाटणाऱ्या‍ पुजारी महिलांनी आज आपल्या देवाला नैवेद्य म्हणून आमरस व पुरणपोळी करून श्रींना नैवेद्य दाखविला.
जोतिबावर आजचा हा पालखी सोहळा शेवटचा असतो. पावसाळ्यात चार महिने हा सोहळा पूर्णपणे बंद असतो. मानाचे उंट, घोडेही डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या पोहाळे गावात विश्रांतीसाठी पाठवले जातात. तेथे त्यांच्यासाठी खास ‘थट्टी’ नावाची इमारत बांधली आहे. तेथेच त्यांची राहण्याची सोय केली आहे. त्यांच्या देखभालीसाठी कायमस्वरूपी कर्मचारी नेमले आहेत. पुन्हा हा पालखी सोहळा खंडेनवमीला सुरू होईल.
दरम्यान, आज सरता रविवार सोहळ्यानिमित्त जोतिबा देवाची पालखी विविधरंगी फुलांनी सजली. मानाचे उंट, घोडेही सजवले गेले. आज गर्दीमुळे डोंगरावर पोलिस बंदोबस्त होता. रात्री आठ वाजता सूचनेची एक टन वजनाची महाघंटा वाजवली गेली आणि अख्खा गाव मंदिराच्या दिशेने येऊ लागला. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा अखंड जयघोष झाला. गुलाल खोबऱ्याची भव्य उधळण झाली आणि मंदिराभोवती पालखी सोहळा सुरू झाला. पालखीचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी महिला व आबालवृद्धांची मोठी गर्दी झाली. सर्व ग्रामस्थ पुजारी गुलालात न्हाऊन गेले. पालखीची मुख्य मंदिराभोवती प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी सदरेवर विराजमान झाली. त्यानंतर गजानन डवरी, मच्छिंद्र डवरी, विश्वनाथ डवरी यांनी डवरीगीते गायिली. त्यानंतर मधू महालदार यांनी वैशिष्ट्यपूर्ण हाळी दिल्यानंतर प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली. या पालखी सोहळ्यासाठी सरपंच राधा बुणे, देवस्थान समितीचे माजी अधीक्षक दीपक म्हेतर, उपसरपंच शिवाजीराव सांगळे, माजी सभापती विष्णुपंत दादर्णे, कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, सहायक उपनिरीक्षक मनोज कदम, सिंधिया देवस्थानचे अधीक्षक अजित झुगर, दहा गावकर, तसेच ग्रामस्थ पुजारी भाविक उपस्थित होते.
...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com