शिक्षक बँक निवडणूकीत संघटना पदाधिकाऱ्यांसह १७ उमेदवारी अर्ज अपात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक बँक निवडणूकीत संघटना पदाधिकाऱ्यांसह १७ उमेदवारी अर्ज अपात्र
शिक्षक बँक निवडणूकीत संघटना पदाधिकाऱ्यांसह १७ उमेदवारी अर्ज अपात्र

शिक्षक बँक निवडणूकीत संघटना पदाधिकाऱ्यांसह १७ उमेदवारी अर्ज अपात्र

sakal_logo
By

शिक्षक बँक निवडणुकीत
१७ उमेदवारी अर्ज अपात्र
अर्ज छाननी; संघटना पदाधिकाऱ्यांचाही समावेश
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शिक्षक समितीच्या महिला जिल्हाध्यक्षा दीपाली भोईटे, पदवीधर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुकुमार पाटील (कागल), ‘पुरोगामी’च्या राज्य उपाध्यक्षा प्रमिला माने, जिल्हा संघटक अशोक खाडे (हातकणंगले) यांच्यासह सतरा जणांचे उमेदवारी अर्ज छाननीत अपात्र ठरविले. शेअर्स व ठेव रक्कम पूर्ण नसणे, वैयक्तिक कर्जाची थकबाकी व जामीनकी थकबाकी यामुळे अर्ज अपात्र ठरल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद ओतारी यांनी दिली.
आज झालेल्या छाननीत सुनील शिंदे, सुभाष विभूते (आजरा), अनिल जाधव (पन्हाळा), प्रकाश फराकटे (भुदरगड), रवींद्र बोडके, बाजीराव पाटील, सुरेश पाटील (राधानगरी), राजाराम पाटील (हातकणंगले), शंकर पाटील (करवीर), सचिन कांबळे (कागल), संध्या महाजन, संजय कुंभार, प्रभाकर चौगुले यांचे अर्ज अपात्र ठरले.

पुरोगामी संघटनेचा आज निर्णय
निवडणुकीत सत्ताधारी गटाविरोधात सर्वसमावेशक एकच पॅनेल करण्यासाठी अन्य विरोधी संघटनांनी मंगळवारी दुपारी दोनपर्यंत सन्मानजनक तोडगा काढावा; अन्यथा चार वाजता समविचारी घटकांना बरोबर घेऊन पॅनेलची घोषणा करणार असल्याचे पुरोगामी संघटनेचे राज्याध्यक्ष व शिक्षक बँकेचे संचालक प्रसाद पाटील यांनी जाहीर केले.

Web Title: Todays Latest Marathi News Phl22b01244 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top