
शिक्षक बँकेसाठी पुरोगामीचे स्वतंत्र पॅनल जाहीर
शिक्षक बँकेसाठी पुरोगामीचे स्वतंत्र पॅनेल
-----------------
सर्वसमावेशक ११ उमेदवारांची यादी जाहीर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी पुरोगामी संघटनेने ‘आपलं पुरोगामी समविचारी पॅनेल’ या नावाने जाहीर करून निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्धार केला. पुरोगामीचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक पॅनेल करून ११ उमेदवारांची पहिली यादी पॅनेल प्रमुख गोविंद पाटील व शंकर पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. पॅनेल प्रमुख श्री. पाटील म्हणाले, ‘‘सभासदांच्या भावनेचा विचार करून सर्व विरोधक एकवटून सत्ताधारी विरोधात एकास एक पॅनेल देण्याचा प्रयत्न केला; पण विरोधक एकवटू नयेत, असे वाटणाऱ्या काही नेत्यांनी युतीत खोडा घातला असून यांनी आम्हाला चार महिने फक्त चर्चेचा फार्स करून झुलवत ठेवत आपापली उमेदवारी जाहीर करून प्रचार व मेळावे सुरू केले.’’
निवडणुकीस फक्त २५ दिवस शिल्लक राहिल्याने सभासदांच्या आग्रहाखातर ‘आपलं पुरोगामी समविचारी पॅनेल’ची घोषणा करीत आहोत. श्री. पवार म्हणाले, ‘‘आमच्या मित्र संघटनांनी ८-८ जागा वाटून घेऊन पुरोगामी शिक्षक संघटनेस फक्त १ जागा घ्या, म्हणणे हा सभासदांचा अवमान आहे. २०१५ च्या निवडणुकीत प्रसाद पाटील यांना २६७९ मते मिळाली होती. ही आकडेवारी पाहता पुरोगामी शिक्षक संघटनेस किमान चार जागा मिळणे आवश्यक होते.’’ प्रसाद पाटील म्हणाले, ‘‘आमच्या सोबत प्रहार शिक्षक संघटना सहभागी असून इतरही समविचारी संघटना अजून संपर्कात आहेत.’’
पत्रकार परिषदेस पी. आर. पाटील, दिलीप भोई, के. एस. पाटील, बळवंत गुरव, विद्या कदम, प्रेरणा चौगुले, राजश्री पिंगळे, अशोक खाडे, हिंदूराव हारुगडे, गोपाळ कदम उपस्थित होते.
--
उमेदवार असे - करवीर - प्रसाद हिंदूराव पाटील, कागल-एस. के. पाटील, आजरा -तानाजी भैरू पावले, चंदगड-प्रकाश विष्णू देसाई, गडहिंग्लज- सुरेश भिमाप्पा हूली, शाहूवाडी- वासंती आनंदराव आसवले, शिरोळ - शंकर मारूती कुंभार, पन्हाळा- बाबासो आनंदा रणसिंग, भुदरगड- वाय. एम. पाटील. महिला- शारदा रंगराव वाडकर, भटक्या जमाती- वैजनाथ माणिकराव दराडे.
Web Title: Todays Latest Marathi News Phl22b01245 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..