शिक्षक बँकेसाठी सत्तारूढ व विरोधी गटाचे पॅनेल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक बँकेसाठी सत्तारूढ व विरोधी गटाचे पॅनेल जाहीर
शिक्षक बँकेसाठी सत्तारूढ व विरोधी गटाचे पॅनेल जाहीर

शिक्षक बँकेसाठी सत्तारूढ व विरोधी गटाचे पॅनेल जाहीर

sakal_logo
By

शिक्षक बँकेसाठी पॅनेल जाहीर
सत्तारूढ गटाने दिली नव्याना संधी; विरोधी पॅनेलचे करवीरमध्ये पाच उमेदवार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्राथमिक शिक्षक संघ सत्ताधारी वरुटे गटाचे व विरोधी पॅनेल आज रात्री उशिरा जाहीर केले. वरुटे गटाने सर्व नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. हातकणंगले तालुक्यात तीन, करवीर व शिरोळ तालुक्यात प्रत्येकी दोघांना संधी दिली. विरोधी पॅनेलने विद्यमान संचालक सुरेश कोळी यांना संधी देत करवीर तालुक्यात पाच जणांना उमेदवारी दिली. शिवाय डीसीपीएस व शिक्षक भारती या संघटनाना एकेक उमेदवारी दिली आहे.
सत्तारुढ वरुटे गटाचे सर्वसाधारण गटातील तालुका प्रतिनिधी असे ः मारुती दिंडे (करवीर), बाबासो साळोखे (शाहूवाडी), अनिल चव्हाण (हातकणंगले), भीमराव पाटील (भुदरगड), पांडुरंग रावण (कागल), अजित मजलेकर (शिरोळ), मायकेल फर्नाडिस (आजरा), बबन केकरे (पन्हाळा), सदानंद पाटील (चंदगड), राजेंद्र मांडेकर (गडहिंग्लज), धोंडिराम पाटील (राधानगरी), श्रीपती तेली (गगनबावडा), इतर मागास गट काशिनाथ कुंभार (पन्हाळा), भटक्या विमुक्त जाती-जमाती संभाजी सिद (हातकणंगले), अनुसूचित जाती-जमाती मदनकुमार कांबळे (शिरोळ), महिला राखीव लता नायकवडे (करवीर), अनिता निटवे (हातकणंगले). शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ पॅनेल जाहीर केले.
सुकाणू समितीचे अध्यक्ष दा. श. सुतार, सदस्य शिवाजी पाटील, दिलीप बच्चे, पी. के. पाटील, वसंत जोशिलकर, रवींद्र नागटिळे, राजेंद्र जुगळे, संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी बापट, बँकेचे अध्यक्ष बाजीराव कांबळे उपस्थित होते.
राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीचे विरोधी पॅनेल असे ः सर्वसाधारण गटातील तालुका प्रतिनिधी राजेंद्रकुमार पाटील, (राधानगरी), शिवाजी रोडे-पाटील (शाहूवाडी), अर्जुन पाटील (हातकणंगले), शिवाजी बोडके (आजरा), गजानन कांबळे (गगनबावडा), बाबू परीट (चंदगड), अमर वरुटे (पन्हाळा), बाळासाहेब निंबाळकर (कागल), सुनील एडके (शिरोळ), नंदकुमार वाईंगडे (गडहिंग्लज), एस. व्ही. पाटील (करवीर), बाळकृष्ण हळदकर (भुदरगड), अनुसूचित जाती-जमाती गट- गौतम वर्धन (करवीर), भटके-विमुक्त गट सुरेश कोळी (करवीर), इतर मागासवर्ग गट रामदास झेंडे (पन्हाळा), महिला प्रतिनिधी वर्षाताई केनवडे, पद्मजा मेढे (करवीर).
शिक्षक नेते ज्योतीराम पाटील, रघुनाथ खोत, थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, सरचिटणीस सुनील पाटील, प्रमोद तौदकर, ए. के. पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Phl22b01263 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top