शिक्षक बँक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक बँक
शिक्षक बँक

शिक्षक बँक

sakal_logo
By

01195


कोल्हापूर : परिवर्तन पॅनेलच्या प्रचार दौऱ्यात पॅनेलप्रमुख प्रसाद पाटील यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते.

वर्षानुवर्षे सत्तेच्या खुर्चीवर
बसणाऱ्यांना बॅंकेतून दूर करा

गोविंद पाटील; कागल तालुक्यात प्रचार दौरा

कोल्हापूर, ता. २७ ः शिक्षक बॅंक कधीतरी नफ्यात आणण्यासाठी सतत तोट्यात घालविणाऱ्या बॅंकेतील सत्ताधाऱ्यांना दूर केले पाहिजे. साम, दाम, दंड, भेद वापरून सत्तेला मगरमिठी मारलेल्या सत्ताधाऱ्यांनी आजवर सभासदांना गृहित धरून दीर्घकाळ सत्ता गाजवली. तथापि सभासदाभिमुख कारभाराला सोयिस्करपणे विसरून सत्ताधाऱ्यांनी मनमानी कारभाराचा कळस केला आहे. स्वाभिमानी पॅनेलचे नेतेही सभासदांना लाभांशापासून वंचित ठेवलेल्यांसोबत होते. त्यामुळे निवडणूक काळात भूलथापा मारून
वर्षानुवर्षे सत्तेच्या खुर्चीवर बसणाऱ्यांना शिक्षक बॅंकेतून दूर करा आणि ‘आप’लं पुरोगामी-समिती-संघ समविचारी परिवर्तन पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन पॅनेल प्रमुख गोविंद पाटील यांनी केले. कागल तालुक्यातील प्रचार दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते.
पाटील म्हणाले की, पुरोगामी विचारानुसार शिक्षक संघ थोरात गटाचे नेते सुरेश कांबळे, जिल्हाध्यक्ष जयवंत पाटील, समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष रवळू पाटील, उपाध्यक्ष विनायक चौगले, उपाध्यक्ष विष्णू जाधव, प्रहार जिल्हाध्यक्ष वैजनाथ दराडे, सेनेचे मनोजकुमार रणदिवे व डीसीपीएसचे विभागीय अध्यक्ष तुषार पाटील यांची साथ मिळाल्याने परिवर्तनचे उमेदवार निवडून येतील.
प्रसाद पाटील म्हणाले की, बँकेतील गेल्या १८ वर्षांच्या कारभाराचा पाढा वाचून २०१५ पासून आम्ही विरोधी भूमिका ठामपणे वठवल्याने बँक सलग ५ वर्षे सरासरी २.५ कोटी इतक्या विक्रमी नफ्यात आली आहे. सत्ताधारी मंडळी नफ्याचे श्रेय घेऊ पाहत असतील तर त्यांनी २००९ ते १५ या काळातील तोट्याची जबाबदारी घेऊन तोटा भरून दिला तर आम्ही आमचे पॅनेल मागे घेऊन त्यांना बिनशर्त साथ देऊ. दौऱ्यात पी. आर. पाटील, दिलीप लोखंडे, बाळनाथ डवरी, प्रकाश साळोखे, सुनील पोवार सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Phl22b01288 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..