शिक्षक बँक बातमीपत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक बँक बातमीपत्र
शिक्षक बँक बातमीपत्र

शिक्षक बँक बातमीपत्र

sakal_logo
By

लोगो- शिक्षक बँक निवडणूक
-

‘एक झलक सतरा सलग’ प्रत्यक्षात

राजेंद्र पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : दि. प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीत शिक्षक समिती व थोरात गट संघाने युती करून इतर शिक्षक संघटनांना बरोबर घेऊन राजर्षी श्री शाहू स्वाभिमानी आघाडीची केलेली गोळाबेरीज, सत्ताधाऱ्यांच्या कारभाराबाबत सभासदांत केलेली जनजागृती, परिवर्तन करायचेच या निर्धाराने विरोधी संघटनांनी बांधलेली मोट यामुळे सर्व १७ जागा मताधिक्क्याने जिंकून आघाडीने ‘एक झलक सतरा सलग’ ही निवडणुकीतील टॅगलाईन प्रत्यक्षात उतरविली. याउलट सत्तारूढ गटांने ‘एकला चलो’ची घेतलेली भूमिका, नव्याने दिलेले सर्वच उमेदवार अन्‌ हाताच्या बोटावर मोजण्याइतपत काहीजण सोडले तर वरुटे गटाच्या प्रस्थापित आजी-माजी संचालकांनी नरो वा कुंजरोवाची भूमिका घेतल्याने वरुटेना एकहाती लढा द्यावा लागला. तिसऱ्या पॅनेलमुळे मतांची विभागणी होऊन विजयी होऊ हा आत्मविश्‍वास सत्ताधाऱ्यांना नडला अन्‌ नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला.
थोरात गट व समितीने कास्ट्राईब, डीसीपीएस व शिक्षक भारती यांना बरोबर घेऊन त्यांना एकेक उमेदवारी दिली. नव्या जुन्यांचा मेळ घातला. छोट्या संघटनांनी प्रामाणिकपणे साथ देऊन स्वाभिमानी आघाडीला पॅनेल टू पॅनेल मते दिली. या छोट्या संघटनांनी केलेली मोठी मदत विरोधी आघाडीला मताधिक्य देऊन गेली.
विजयी आघाडीला शिरोळ, कागल, गडहिंग्लज तालुक्यांनी मोठी साथ दिली. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, सरचिटणीस सुनील पाटील, रघुनाथ खोत या प्रमुखासह विलास चौगुले, प्रकाश खोत, प्रकाश येडगे, शिक्षक समितीचे नेते ज्योतिराम पाटील, जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील, सरचिटणीस प्रमोद तौंदकर यांच्यासह संदीप मगदूम, शाहू चौगुले, बालाजी पांढरे आदी विजयाचे शिल्पकार ठरले.

चौकट
लॉटरी, निष्ठा अन् करिश्‍मा
पाच वर्षांत सुनील एडके, सुरेश कांबळे, शिवाजी रोडे-पाटील यांनी बँकेच्या कारभाराविरोधात रान उठवत सभासदांत जागृती केली. त्यामुळे एडके व रोडे-पाटील यांनी सर्वाधिक मताधिक्क्य घेतले. करवीरमध्ये एस. व्ही. पाटील यांचे स्वप्न पूर्ण झाले. समितीचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील यांनी गुलाल खेचून घेतला. राधानगरीचे राजेंद्र पाटील व रामदास झेंडे यांना निष्ठेचे फळ मिळाले. कागलमध्ये बाळासाहेब निंबाळकर यांची हुशारी कामाला आली. संघटनेत पती-पत्नीसह काम केल्याने वर्षा केनवडे यांना संधी मिळाली. कास्ट्राईबचे गौतम कांबळेंना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. केवळ संघटनांमुळे डीसीपीएसचे अमर वरुटे व शिक्षक भारतीचे गजानन कांबळे या नवख्या तरुणांना नोकरीच्या अत्यल्प काळात संचालक पदाची लॉटरी लागली. दुसऱ्यांदा विजयी होत सुरेश कोळींनी करिष्मा दाखविला. पद्मजा मेढे यांच्या विजयाने ए. के. पाटील गटाला उभारी मिळाली.

Web Title: Todays Latest Marathi News Phl22b01321 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..